जागतिक व्यंग्यचित्र दिन ! रेषांमधून हसविणारे किमयागार

जागतिक व्यंग्यचित्र दिनानिमित्त घेतलेला व्यंग्यचित्रकारांचा हा आढावा
Hasyadin
HasyadinCanva

जागतिक व्यंग्यचित्र दिन (World Cartoon Day) दरवर्षी पाच मे रोजी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त हसऱ्या रेषांच्या किमयागारीची ही धावती झलक... आज जागतिक व्यंग्यचित्र दिन... आजच्याच दिवशी म्हणजे 5 मे 1895 मध्ये जोसेफ पुलित्झर यांच्या "न्यूयॉर्क वर्ल्ड'मध्ये रिचर्ड एफ. आऊटकॉल्ट यांनी रेखाटलेल्या डोक्‍यावर केस नसलेल्या आणि अंगात पिवळा नाईट गाऊन परिधान केलेल्या "द यलो किड' या नावाने संबोधित एका हसणाऱ्या मुलाचे चित्र प्रकाशित झाले होते. ते जगातील पहिले व्यंग्यचित्र म्हणून ओळखले जाऊ लागले. (This is a review of cartoonists taken on the occasion of World Cartoon Day)

यामुळे रूढ झाला "कार्टून' हा शब्द

तत्पूर्वी, ब्रिटनमध्ये बांधल्या जात असलेल्या पार्लमेंट हाउसच्या लांब-रूंद भिंती; भित्तिचित्रांनी सजवाव्यात या संकल्पनेनुसार अनेक चित्रकारांमध्ये स्पर्धा लावून चित्रे मागविण्यात आलेली होती. त्यातील अनेक चित्रे सुमार दर्जाची होती. त्या वेळी राणी व्हिक्‍टोरियांचे पतीराज प्रिन्स अल्बर्ट यांनी त्या सुमार चित्रांची खिल्ली उडविण्याच्या हेतूने वापरलेला "कार्टून' हा शब्द पुढे रूढ झाला.

Hasyadin
"उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

रुपभेदाः, प्रमाणानि, भावलावण्ययोजनम्‌।

सादृश्‍यं वर्णिकाभङ्‌ग इतिचित्रं षडङ्‌गकम्‌।।

यशोधराने सांगितलेली चित्रकलेची सहा अंगे कलेतल्या सगळ्याच उपविषयांना लागू पडतात. व्यंग्यचित्रेही याला अपवाद नसावीत. सहजसुंदर, ओघवती, वेगवान रेषा प्रमाण, मूळ प्रतिमेशी साधर्म्य साधणारी, ताल, तोल, लय आणि तत्क्षणी प्रकट होणारा भाव ही व्यंग्यचित्राचीही मूलतत्त्वे आहेत. व्यंग्यचित्रातून विनोद निर्माण होतो. "टवाळा आवडे विनोद' असं समर्थांचं वचन आहे. म्हणजे व्यंग्यचित्रकाराला टवाळाचीही भूमिका बजावावी लागते.

व्यंग्यचित्रातून साध्या साध्या विषयातून मोठा आशय व्यक्त करता येतो, ज्याच्याकडे पाहून पाहणारा अंतर्मुख होतो. खरं तर आशय-विषयाचं बंधन व्यंग्यचित्राला नसतंच. प्रबोधन, सामाजिक जागृती, टीकाही त्यातील रेखाटन कल्पकतेने साधता येते. अवाजवी ताणलेल्या, फुगविलेल्या नको तेवढ्या आकुंचित, संकोचित रेषांमधून अतिशयोक्ती साधता येते. सद्य:स्थिती, समाजातील रूढ अपप्रवृत्ती, राजकीय नेत्यांच्या बोलण्या- वागण्यातील विसंगती दाखवून "शहाण्याला शब्दांचा मार'प्रमाणे "साप भी मरे; और काठी भी ना टूटे' इतक्‍या सहजतेने अवघ्या रेषांच्या माध्यमातून परिणाम साधता येतो. त्याचा किमयागार अर्थात असतो व्यंग्यचित्रकार!

Hasyadin
विद्यापीठाच्या परीक्षा 6 मेपासून ऑनलाइन ! तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाइन

एखाद्याला सहजतेने वठणीवर आणायचं सहजसुंदर सोपं असं हे कार्टूनचं माध्यम आहे. भ्रष्टाचार, जनमानसातली मानसिक घुसमट याचंही मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवतं. आर. के. लक्ष्मण हे भारतातील प्रख्यात व्यंग्यचित्रकार. त्यांच्या व्यंग्यचित्रातला "कॉमन मॅन' सर्वपरिचित आहे. त्या कॉमन मॅनचं पुण्यातले शिल्पकार विवेक खटावकर यांनी शिल्पात रूपांतर केलं आहे. हा "कॉम नमॅन' पन्नास वर्षांतील देशातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा साक्षीदार आहे.

भारतीय व्यंग्यचित्र युगावर अनभिषिक्त राज्य करणारा आणखी एक चित्रकार म्हणजे मारिओ मिरांडा; आर. के. लक्ष्मणांचेच समकालीन; तरीही त्यांची स्वतंत्र शैली होती. त्यांच्या व्यंग्यचित्रांची खासियत अशी, की उंच उंच इमारती, उंच उंच झाडे, चित्रातली माणसांची भाऊगर्दी, प्राणी, पक्षी यांचेही प्रसंगनिहाय रेखाटन, उपलब्ध अवकाशाचा पुरेपूर आणि सुयोग्य विनियोग हे त्यांच्या व्यंग्यचित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य. चित्रांची मागील स्पेस अतिशय कल्पकतेने नटविलेली दिसते. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसायट्यांमधील जीवनशैली आणि त्यांची स्वतःची गोमंतकीय जीवनशैली ते आपल्या चित्रांमधून जिवंत करायचे. त्यांची चित्रे ही इतरांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असत.

व्यंग्यचित्रकारांच्या या मांदियाळीत एका घराण्याचं नाव प्रकर्षाने पुढं येतं ते घराणं म्हणजे ठाकरे घराणं. स्व. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे बहुदा व्यंग्यचित्रांच्या इतिहासात एकमेवाद्वितीय असं हे उदाहरण असावं, की एकाच घरात तीन- तीन व्यंग्यचित्रकार जन्माला यावेत. आपल्या कुंचल्याच्या बोचऱ्या फटकाऱ्यांनी भल्याभल्या राजकारण्यांना बाळासाहेबांनी "सळो की पळो' करून सोडले होते.

आज जसा जागतिक व्यंग्यचित्र दिन आहे ना तसा आज व्यंग्यचित्रकार दिनही आहे. महाराष्ट्रात व्यंग्यचित्रकारांची मांदियाळी आहे. वसंत सरवटे, हरिश्‍चंद्र लचके, शि. द. फडणीस, मंगेश तेंडूलकर, प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, विवेक मेहेत्रे, वैजनाथ दुलंगे, खलील खान, मुकीन तांबोळी, अजय पुरंदरे, मनोहर सप्रे, विकास सबनीस, आलोक, चारूहास पंडित, पोरे बंधू, विजय पराडकर आदी अनेकांचे या क्षेत्रात योगदान आहे.

- मुकुंद वेताळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com