esakal | बेजबाबदारीचा कळस! सिद्दलिंगेश्वर यात्रेला हजारोंची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

siddhlingeshwar

भारतात कोरोनाचा पहिला मृत्यू झालेल्या कलबुर्गी जिल्ह्यातील एका यात्रेसाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बेजबाबदारीचा कळस! सिद्दलिंगेश्वर यात्रेला हजारोंची गर्दी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर ः भारतात कोरोनाचा पहिला मृत्यू झालेल्या कलबुर्गी जिल्ह्यातील एका यात्रेसाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनामुळे एकीकडे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचवेळी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील सिद्दलिंगेश्वर यात्रेसाठी आज कर्नाटकातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती.

मोठी बातमी ः मालवाहतुकीतील अडचणी दूर होणार, आरटीओतून मिळणार परवानगी

कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्याच्या चित्तपूर तालुक्यातील झालेल्या या यात्रेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या यात्रेत सहभागी झालेले भक्त एकमेकांच्या मदतीने रथ ओढताना दिसत आहेत. एवढेच नव्हे हा रथसोहळा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विेशेष म्हणजे देशातील पहिल्या कोरोना रुग्णाचे निधन याच कलबुर्गी जिल्ह्यात  झाले होते. 

महत्वाची बातमी ः मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी हा रथसोहळा सुरु होता आणि तो पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी जमली होती, त्यावेळी स्थानिक पोलिस आणि प्रशासन मूग गिळून गप्प होते. त्यांनी या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचनेचे उल्लंघन होत असतानाही जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

हे वाचा ः धक्कादायक! 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण

दरम्यान, गुरुवार(ता.16) पर्यंत कर्नाटकात कोरोनाच्या 315 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 82 जण बरे होऊ घरी परतले, तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
 

loading image