esakal | भारतात तीस लाख मुले धनुर्वात लशीपासून वंचित; WHOचा अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात तीस लाख मुले धनुर्वात लशीपासून वंचित; WHOचा अहवाल

भारतात तीस लाख मुले धनुर्वात लशीपासून वंचित; WHOचा अहवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जीनिव्हा : जगासह भारतातही कोरोना लसीकरण मोहिम सुरू असताना २०२० मध्ये देशातील तीस लाखांहून अधिक मुले घटसर्प-धनुर्वात-डांग्या खोकलाच्या संयुक्त लशीच्या पहिल्या डोसपासून (डीपीटी - १) वंचित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. जगभरातही अशीच स्थिती असून २०१९ च्या आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये ही लस न मिळणाऱ्या बालकांची संख्या ३५ लाखांनी वाढली. त्याचप्रमाणे, इतर ३० लाख मुलेही गोवरच्या लशीपासून वंचित राहिली. (Three million children in India away from tetanus vaccine WHO report)

हेही वाचा: शिवलिंगाच्या प्रतिमेतील 'रुद्राक्ष सेंटर'चं मोदींच्या हस्ते उद्घाटन

लशीच्या ‘डीपीटी’ या गटात घटसर्प, डांग्या खोकला, आणि धनुर्वात या तीन आजारांवरील लशींचा समावेश होतो. भारतात २०१९ च्या तुलनेत डीपीटीचा पहिला डोस न मिळणाऱ्यांची संख्या वाढली. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने याबाबतची अधिकृत आकडेवारी आज जाहीर केली. त्यानुसार, या लशीचा पहिला डोस न मिळालेल्या मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमधील मुलांची संख्या मोठी आहे. भारतातील मुलांची संख्याही मोठी असून तिसरा डोस न मिळालेल्यांची टक्केवारी ९१ वरून ८५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

कोरोना साथीने जगभरात बालकांच्या लसीकरणावरही मोठा परिणाम झाला. जवळपास दोन कोटींहून अधिक बालकांना प्राथमिक लशीही मिळाली नाही. जगभरातील लसीकरणातील असमानताही समोर आली असून एक कोटी ७० लाख मुलांना एकही लस मिळाली नाही. बहुतेक मुले दुर्गम प्रदेश किंवा झोपडपट्टीतील आहेत. कोरोना लढ्यात गुंतल्यामुळेही अनेक ठिकाणी या नेहमीच्या लसीकरणावर परिणाम झाला.

हेही वाचा: Good News - कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान

जगातील अनेक देश कोरोना लस मिळण्यासाठी आवाज उठवित आहेत. मात्र, इतर लसीकरणापासून आपण मागे गेलो आहोत. त्यामुळे, मुलांना पोलिओ, गोवर आदी आजरांचा धोका वाढला आहे. कोरोना काळात अशा आजारांचा उद्रेक आपत्तिमय असेल. प्रत्येक बालकाला लस मिळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. टेड्रोस घेब्रेयसूस यांनी म्हटलंय.

लस न मिळालेली बालके (भारत)

वर्ष एकूण मुले

२०१९ चौदा लाख तीन हजार

२०२० तीस लाख ३८ हजार

loading image