जामा मस्जिदनंतर आता 'या' धार्मिकस्थळी टिकटॉकला मनाई!

वृत्तसंस्था
Sunday, 9 February 2020

काही दिवसांपूर्वीच दरबार साहिब कॉम्प्लेक्समध्ये डान्स करताना व्हिडिओ शूट करण्यात आला होता, त्यानंतर त्या मुलीने माफी मागितली होती.

चंडीगड : सध्या सोशल मीडियावर टिकटॉक व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असले, तरी समाजातील थिल्लरपणा समोर येत आहे. परिणामी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने सुवर्णमंदिरात किंवा परिसरात टिकटॉक व्हिडिओ तयार करण्यास मनाई केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हरमिंदर साहिब येथे भाविकांनी टिकटॉक व्हिडिओसाठी शूट करू नये, अशी भाविकांना तंबी देण्यात आली आहे. या संदर्भात टिकटॉकवर बंदी घातल्याचे ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. 

- U19CWC Final : 'गेम चेंजर' रवी बिष्णोईच्या नावावर नवा विक्रम!

चीनची कंपनी बाइटडान्सची मालकी असलेल्या टिकटॉक व्हिडिओची तरुणांत प्रचंड क्रेझ आहे. भारतात २० कोटीहून अधिक मंडळी टिकटॉकला फॉलो करत आहेत. अकाली तख्तचे प्रमुख गिआनी हरप्रीत सिंग यांनी टिकटॉक व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सुवर्ण मंदिरात मोबाईल फोन नेण्यास परवानगी आहे. मात्र, तरीही टिकटॉकचे व्हिडिओ सुरू राहिल्यास मोबाईल नेण्यास बंदी घालण्याबाबतही विचार करावा लागेल.

- CoronaVirus : संकटकाळात भारत देणार चीनला मदतीचा हात

एवढेच नाही, तर सुवर्ण मंदिरात सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना मंदिर परिसरात फोटो आणि व्हिडिओ काढण्याबाबत भाविक विनंती करत असतात, असे जत्थेदारांनी सांगितले. सुवर्णमंदिर परिसरात व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यास सुवर्णमंदिर व्यवस्थापनाने बंदी घातली आहे. धार्मिक वातावरण बिघडू नये म्हणून खबरदारी घेतली जात असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

- माझा देश धर्मशाळा वाटली का?; राज ठाकरेंचा आझाद मैदानावरून सवाल

काही दिवसांपूर्वी सुवर्णमंदिर परिसरात तीन मुलींनी पंजाबी गाणे म्हणत टिकटॉक व्हिडिओचे शूटिंग केले होते. या व्हिडिओची दखल घेत व्यवस्थापनाने तातडीची कारवाई केली. हा दुसरा प्रकार असून काही दिवसांपूर्वीच दरबार साहिब कॉम्प्लेक्समध्ये डान्स करताना व्हिडिओ शूट करण्यात आला होता, त्यानंतर त्या मुलीने माफी मागितली होती. 

जामा मस्जिदमध्येही टिकटॉकला मनाई

दरम्यान, जामा मस्जिद परिसरातही टिकटॉक व्हिडिओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मस्जिद परिसरात व्हिडिओ शूट करताना कोणी आढळून आल्यास त्यांना पकडण्यासाठी 10 सदस्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TikTok videos and selfies banned inside Golden Temple premises