U19CWC Final : 'गेम चेंजर' रवी बिष्णोईच्या नावावर नवा विक्रम!

U-19-Ravi-Bishnoi
U-19-Ravi-Bishnoi

INDvsBAN : पोचेस्ट्रूम : येथे भारत-बांगलादेश या संघांमध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची फायनल मॅच रंगली. बांगलादेशच्या टीमने सुरवात जोरदार केली. परवेझ इमॉन आणि तांझिद हसन यांनी 8व्या ओव्हरमध्येच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यावेळी ही मॅच बांगलादेश आरामात जिंकेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, या मॅचचे रुपडे पालटले ते भारताच्या रवी बिष्णोईने. 

फिरकीपटू असणाऱ्या बिष्णोईने हसनला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर महमुदूल जॉयचा त्रिफळा उडवला. तोहिद ऱ्हिदॉयला पायचित करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरत असताना बिष्णोईने शहादत हुसेनला बाद करत या मॅचमध्ये टीम इंडियाचे कमबॅक केले. एकवेळ नाबाद 50 अशी स्थिती असणाऱ्या बांगलादेशची अवस्था 16.1 ओव्हरमध्ये 4 बाद 65 अशी झाली होती. 

गेमचेंजर बिष्णोई 

बांगलादेशला खिंडार पाडलेल्या बिष्णोईने 10 ओव्हर टाकताना 30 रन्समध्ये 4 विकेट घेतल्या. यावेळी त्याने 3 मेडन ओव्हर टाकल्या. पहिल्या स्पेलमध्ये बिष्णोईने 5 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्यात एका मेडन ओव्हरचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने 2 मेडन ओव्हर टाकल्या, पण त्याला विकेट मिळाली नाही. 

बिष्णोईच्या नावावर विक्रम

बांगलाचे आघाडीचे बॅट्समन माघारी धाडलेल्या बिष्णोईच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत तो सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. त्याने या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com