मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांनी निवडली 'सेफ' जागा; TMC आमदाराचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamata

मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांनी निवडली 'सेफ' जागा

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये (Nandigram) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपच्या सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींविरोधात विजय मिळवला. त्यानंतर ममता बॅनर्जी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ भवानीपूरमधून (Bhavanipur) विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहेत. भवानीपूर मतदार संघातील आमदार शोभन देव चॅटर्जी यांनी राजीनामा दिला आहे. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघा आहे. मात्र यावेळी सुवेंदु यांनी दिलेल्या आव्हानानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढल्या. तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. आता राज्यात बहुमत मिळाले पण ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानं पुढच्या सहा महिन्यात त्यांना कोणत्याही मतदारसंघातून विधानसभा सदस्य होणं गरजेचं आहे. (tmc mla resign from bhavanipur mamata may contest bypoll)

राजीनामा देण्याआदी शोभन देव चॅटर्जी यांनी म्हटलं की,''मुख्यमंत्री बॅनर्जी यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही मतदारसंघातून विजय मिळवायचा आहे. मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवली आणि जिंकलो. आता ममता निवडणूक जिंकाव्यात यासाठी मी राजीनामा देत आहे. ममता बॅनर्जींचा विजय आमच्या सर्वांसाठी आहे.'' शोभन चॅटर्जी यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे.

हेही वाचा: ‘नारद’ भ्रष्टाचारप्रकरणी तृणमूलचे नेते नजरकैदेत

याआधी 2011 मध्ये सुव्रत बोक्शींनी तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तेव्हाही ममता बॅनर्जी यांच्यासाठी सुव्रत यांनी राजीनामा दिला होता. पुढे 2016 मध्ये ममता बॅनर्जी भवानीपूरमधूनच लढल्या होत्या. यावेळी मात्र त्यांनी नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला होता.

loading image
go to top