esakal | मोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

मोदींनी त्यांच्या भाषणात स्त्रिया डाव्या बाजुला पदर का घेतात याबाबत एक कथाही सांगितली. त्यावरून तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेत ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. 

मोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला आक्षेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल मार्गदर्शन केलं. यावेळी मोदी म्हणाले की, महान संस्थापक रविंद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीकोनाचा अर्थ आत्मनिर्भर भारताचा होता. त्यांनी विद्यापीठाने स्वातंत्रसंग्रामात रविंद्रनाथ टागेर यांच्या मार्गदर्शनात भारताच्या राष्ट्रवादी भावनेला मूर्त रूप दिलं होतं. संपूर्ण मानवतेला भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाने समृद्ध करण्याची गुरुदेवांची इच्छा होती. आत्मनिर्भर भारताचं दर्शनसुद्धा याच भावनेतून निर्माण झालं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या गुजरात कनेक्शनबाबत मोदींनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुदेवांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ यांची नियुक्ती गुजरातमध्ये झाली होती. त्यावेळी रविंद्रनाथ टागोर त्यांना भेटण्यासाठी अहमदाबादला येत होते. गुरदेवांनी गुजरातमध्ये दोन कवितासुद्धा लिहिल्या होत्या. तसंच गुजरातची मुलगी गुरुदेवांच्या घरची सून बनून आली होती. 

हे वाचा - मोदी आता भागवतांनासु्द्धा दहशतवादी म्हणतील, लोकशाही फक्त कल्पनेत - राहुल गांधी

मोदींनी त्यांच्या भाषणात स्त्रिया डाव्या बाजुला पदर का घेतात याबाबत एक कथाही सांगितली. त्यावरून तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेत ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी म्हटलं होतं की, जेव्हा सत्येंद्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहत होत्या तेव्हा त्यांनी पाहिलं की, गुजराती महिला साडीचा पदर उजव्या बाजुला ठेवायच्या. त्यावेळी ज्ञानेंद्री देवी यांनी साडीचा पदर डाव्या बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला होता आणि तो आजही कायम आहे. 

साडीच्या पदराची मोदींनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्यांचे संदर्भ खोटे असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ब्रत्य बोस यांनी म्हटलं की, टागोर आणि गुजरात यांना जोडण्याचा प्रयत्न अक्षम्य असा होता. टागोर यांचे बंधू गुजरातमध्ये होते पण ते सर्वात मोठे नव्हते.  तसंच त्यांच्या पत्नीचं नाव ज्ञानदानंदिनी होतं होतं. मोदींनी काही वेगळंच सांगितलं. ज्ञानदानंदिनी आणि साडीच्या पदराची गोष्ट एक मिथक आहे ते सत्य नाही. 

हे वाचा - आंदोलन मागे घ्या, अन्यथा दिल्ली दंगलीसारखी अवस्था करु; शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या रागिनीविरोधात तक्रार

विश्वभारती विद्यापीठाला राष्ट्रवादाचं प्रतिक म्हटल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं की, पंतप्रधानांनी टागोर यांच्या राष्ट्रवादाबाबत सांगितलं. खरंतर टागोरांनी राष्ट्रवादाला सर्वाधिक फूट पाडणारी गोष्ट म्हटलं होतं. धर्मात फूट पाडण्यासाठी या शब्दाच्या वापराची वकिली टागोरांनी केली नव्हती. त्यांची कादंबरी गोरा धर्माबद्दल होती आणि याचा अर्थ मानव धर्म असा होता. घरे बैरे कादंबरीतून त्यांनी राष्ट्रवाद एक व्यसन आहे असं सांगितलं होतं असंही बोस यांनी म्हटलं. 

loading image