ट्रिपल मर्डर: 10 वर्षांच्या मुलीसह पिता अन् आजीची दगडाने ठेचून हत्या

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
MURDER
MURDERSakal

छत्तीसगडमधील रायगडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व कुटुंब जंगलात एका झोपडीत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या हत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मृतांमध्ये १० वर्षांची मुलगी, तिचे वडील आणि आजी यांचा समावेश आहे. चलाहा गावात राहणारा अमृत लाल हा आपली ६५ वर्षीय आई दुहनीबाई आणि १० वर्षीय मुलगी अमृता यांच्यासोबत मोहा गोळा करण्यासाठी धवाईडांड येथे गेले होते. (Triple Murder of father, grandmother and daughter; Police investigating)

MURDER
वॉशिंग मशिनमध्ये घालून मुलीला मारलं ठार; ओव्हनमध्ये लपवला मृतदेह

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सर्वजण जंगलातच मोहाच्या झाडाखाली झोपडी बनवून राहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकरी तेथून जात असताना त्यांची नजर या तिघांच्या मृतदेहांवर पडली. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

MURDER
व्हायग्रा घेऊन आला 81 वर्षाचा पती; पत्नीने नकार दिल्याने केले वार

या सर्वांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, ही तिहेरी हत्या कोणी आणि का केली? हे अद्याप कळलेले नाही. वरिष्ठ अधिकारी तसेच श्वानपथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली आहे. हा हत्येचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com