
ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक प्रकरणी पुरुषांविरुद्ध दाखल एफआयआर आणि आरोपपत्रांची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. ट्रिपल तलाक देणाऱ्या पुरुषांवर किती गुन्हे आहेत, आरोपपत्रं किती दाखल झाली, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितली आहे.