esakal | प्रेयसीच्या 'त्या' सवयीला खूप कंटाळलो होतो...
sakal

बोलून बातमी शोधा

troubled by this habit of girlfriend lover took this step at rajasthan

विवाहीत महिलेचे आणि माझे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. पण, तिच्या सवयीला कंटाळून तिचा खून केला, अशी माहिती प्रियकराने पोलिसांना दिली.

प्रेयसीच्या 'त्या' सवयीला खूप कंटाळलो होतो...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): विवाहीत महिलेचे आणि माझे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. पण, तिच्या सवयीला कंटाळून तिचा खून केला, अशी माहिती प्रियकराने पोलिसांना दिली.

Video: पाकची दुरावस्था; काय चोरतात पाहा...

एका विवाहीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत तिच्या भावाने खूनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सुरेश जाट याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. सुरेशसह त्याचा मित्र नानूराम लुहार याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

'...तर महिला डॉक्टरवर बलात्कार करू'

सुरेशने चौकशीदरम्यान सांगितले की, पांची दिवी आणि माझ्यात अनैतिक संबंध होते. परंतु, ती सतत पैशांची मागणी करत असायची. अनेकांकडून पैसे घेऊन तिला दिले पण तिची मागणी थांबतच नव्हती. तिच्या या सवईला कंटाळलो होतो. मग तिचा खून करण्याचे ठरवले. मदतीसाठी नानूरामची मदत घेतली. प्रथम उंदीर मारण्याचे औषध दिले आणि त्यानंतर गळा दाबून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला.

बायको माझी अन् बोलते त्याच्याशी; कसं चालेल...