आमच्या डोळ्यांसमोर काँग्रेस कमकुवत होतेय; 'जी-23' गटाची हतबलता

congress leader g23
congress leader g23

नवी दिल्ली - काँग्रेसमधील ज्येष्ठांचा असंतुष्ट गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जी-23’च्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा पक्ष श्रेष्ठींना आरसा दाखवीत गांधी कुटुंबाच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पक्ष कमकुवत होतोय हे सत्य आहे. हे सांगण्यासाठी आम्ही येथे एकत्र आलो आहोत. आता आपल्याला पक्ष मजबूत करायला हवा, असे मत ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मांडले.

पक्षाचे भले व्हावे म्हणूनच आम्ही आवाज उठविला आहे, पक्ष मजबूत व्हायला हवा. आम्ही पक्षाचा सुवर्णकाळ पाहिला आहे, आता म्हातारपणी पक्षाची होत असलेली पडझड पाहवत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज बब्बर म्हणाले की, ‘‘ लोक आम्हाला जी-23 चा गट असे म्हणतात पण मी मात्र स्वतःला ‘गांधी-23’ चा समूह असे मानतो. जो गट महात्मा गांधी यांच्या विचारांवर विश्‍वास ठेवतो आणि त्याच मार्गावर वाटचाल देखील करतो. आमच्या गटाला पक्ष बळकट व्हावे असेच वाटते. ’’

अवघा देश आणि काँग्रेस पक्षाला देखील आज गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. भाजपने जम्मू-काश्‍मीरचे चुकीच्या पद्धतीने विभाजन केले आहे.
- मनीष तिवारी, नेते काँग्रेस

आझादांचे स्वागत
राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद प्रथमच जम्मू- काश्‍मीरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आझाद यांनी मी संसदेमधून निवृत्त झालो असलो तरीसुद्धा राजकारणातून झालो नसल्याचे सांगितले.

आम्ही सगळे फार विचार करून एकत्र आलो आहोत, आता पाचही राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसचाच प्रचार करणार आहोत.
-अभिषेक मनू सिंघवी, नेते काँग्रेस

मध्यंतरी वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी उत्तर भारतीय मतदारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आझाद म्हणाले की, ‘‘ तुम्ही जम्मू-काश्‍मीरचे असा किंवा लडाखचे आपण सर्व धर्म, जाती आणि लोकांचा आपण सन्मान करतो. हेच आपले बलस्थान असून ते आपण कायम ठेवायला हवे.’’ या संमेलनामध्ये कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर यांच्यासह गुलाम नबी आझाद, खासदार विवेक तनखा, खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com