esakal | कंगना आतातरी भानावर ये! ट्विटरलाही टिवटिव पटेना
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut twitter

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवणारे ट्विट केले होते. याला विरोध म्हणून कंपनाने ट्विटचा भडीमार केला होता. कंगनाने शेतकऱ्यांना थेट दहशतवादी ठरवले होते.

कंगना आतातरी भानावर ये! ट्विटरलाही टिवटिव पटेना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- ट्विटरने गुरुवारी बॉलिवूड स्टार कंगना रणौत विरोधात कारवाई केली असून तिचे काही ट्विट डिलिट केले आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवणारे ट्विट केले होते. याला विरोध म्हणून कंपनाने ट्विटचा भडीमार केला होता. कंगनाने शेतकऱ्यांना थेट दहशतवादी ठरवले होते. त्यानंतर कंगनाने पंजाबी कलाकार दिलजित दोसांजला खलीस्तानी म्हटलं होतं. तिच्या या बेताल ट्विटवर कारवाई करत ट्विटरने तिचे ट्विट हटवले आहेत. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं कारण यामागे देण्यात आलं आहे.  

कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात होतं. त्यानंतर कंगनाने दिलजित दोसांजशी पंगा घेतला. ट्विटर या सर्व ट्विटकडे लक्ष ठेवून होते. कंगनाचे काही ट्विट कंपनीच्या नियमांचे भंग करणारे होते. तसेच यामुळे फेक न्यूज पसरण्याचा धोका होता. त्यामुळे ट्विटरने कंगना रणौतचे ट्विट डिलिट केले आहेत. 

हे वाचा - भाजप बजेटचीही करणार जाहिरातबाजी; नेत्यांना दिलेत आदेश

ट्विटरने काही आठवड्यांपूर्वी फेक न्यूजप्रकरणी २५० अकाऊंट्स डिलिट केले होते. भारतात शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसा झाली होती. या पार्श्वभूमीवर ट्विटर योग्य ते पाऊल उचलताना दिसत आहे. कंगना अनेक मुद्द्यामध्ये अकारण उडी घेत आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असून कोणत्याही मुद्द्यावर ती भडकपणे व्यक्त होत असते. अनेकदा तिचा तोल सुटला असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

कंगनाचे ट्विटरवर ३० लाख फोलोवर्स आहेत. तिने शेतकऱ्यांविरोधात केलेले एकामागून एक ट्विट वादग्रस्त ठरत आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे नेता मनजित सिंग जीके यांनी ट्विटरला कायदेशीर नोटीस पाठवून कंगनाने केलेले वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यास सांगितले होते. कंगाने आंदोलन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दहशतवादी ठरवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तिच्याविरोधात रोष आहे. 

हे वाचा - 'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांनी व्यक्त केलं सडेतोड मत

महाराष्ट्राचे ट्विटर संचालक यांना नोटीस पाठवण्यात आली होती. कंगनाचे ट्विट शेतकऱ्यांची आणि शिख समुदायाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब करणारे आहेत, असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं होतं. पॉपस्टार रेहानाने ट्विट करत भारतातील शेतकऱ्यांना समर्थन दर्शवलं होतं. त्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, माजी पॉर्नस्टार मिआ खलिफानेही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कंगनाने काही तासातच खालच्या पातळीवर जात प्रत्युत्तर दिलं होतं.

loading image