esakal | Coronavirus : रुग्णांची संख्या वाढतीये; आता आणखी...

बोलून बातमी शोधा

Coronavirus : रुग्णांची संख्या वाढतीये; आता आणखी...

चौघांची प्रकृती स्थिर

Coronavirus : रुग्णांची संख्या वाढतीये; आता आणखी...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जपानच्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील आणखी दोन भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी जहाजावरील चार क्रू मेंबर्सना लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी दोन क्रू मेंबर्सना लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत भारतीय दूतावासाने सांगितले, की डायमंड प्रिन्सेस येथे नव्या 99 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता या जहाजावरील रुग्णांची संख्या 454 वर गेली आहे. यामध्ये 2 भारतीय क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे, आता त्याची संख्या 6 झाली आहे.

Coronavirus:चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम; 24 तासांत 2 हजार जणांना लागण!

चौघांची प्रकृती स्थिर

यापूर्वी जहाजातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. हे समजल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत, असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. 

CoronaVirus : स्त्री की पुरुष कोणाला आहे कोराना व्हायरसचा अधिक धोका?