Video: पंक्चर काढत होते अन् JCBचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: पंक्चर काढत होते अन् JCBचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू

छत्तीसगडमधील रायपूरमधील सिलतारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गॅरेजमध्ये टायरमध्ये हवा भरत असताना जेसीबी (JCB) टायरचा स्फोट होऊन तेथील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही संपुर्ण घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली. हा सीसीटिव्हीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (two people lost their lives in jcbs tyre blast in chhattisgarhs raipur)

हेही वाचा: लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणाची हत्या, ऑनर किलींगचा संशय

ही घटना ३ मे ची असून या व्हिडीओतील स्फोट पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.या व्हिडीओत दिसते की गॅरेजमधील एक कर्मचारी जेसीबीचा टायर काढून त्यात हवा भरत होता.

हवा भरताना आजूबाजूला असणारे दोन कर्मचारी पैकी एकजण हवा तपासतो आणि पुढे जातो. त्यानंतर पुन्हा तिथे असलेला एक कर्मचारी हवा व्यवस्थित भरली का,हे तपासण्यासाठी टायरवर जोर देतो मात्र अचानक टायर फुटतो. हा स्फोट इतका भीषण होता की टायरजवळील दोन्ही कर्मचाऱ्यांनी हवेत उडले आणि या दोघांचा जागीच मृत्यु झाला.

हेही वाचा: "चुकीला माफी नाही" पोलिसांशी पंगा घेणाऱ्यांचे सुजवले तोंड; पाहा व्हिडीओ

राजपाल सिंह आणि प्रांजन नामदेव असे मृतांची नावे आहेत.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अधिकाअधिक शेअर केला जात आहे.

Web Title: Two People Lost Their Lives In Jcbs Tyre Blast In Chhattisgarhs Raipur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChhattisgarhviralVideo
go to top