
काश्मीर खोऱ्यात ना‘पाक’ कट उधळला; दोन दहशतवादी ठार तर चौघे अटकेत
सुरक्षा दलांनी खोऱ्यात दहशतवाद्यांचा (terrorist) मोठा कट उधळून लावला आहे. श्रीनगरमध्ये चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. तर अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन दिवसांत दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही तिसरी चकमक आहे. (Two terrorists killed, four arrested)
मंगळवारी सुरक्षा दलांनी पाकिस्तानने पुरस्कृत केलेला मोठा दहशतवादी कट हाणून पाडला. श्रीनगरमधील बेमिना परिसरात चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. तर अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
हेही वाचा: आता राणा दाम्पत्याचे घर मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर; हातोडा पडणार?
प्रतिबंधित दहशतवादी संघटना TRF/LeT च्या चार संकरित दहशतवाद्यांना (terrorist) श्रीनगर पोलिस आणि लष्कराने (2RR) श्रीनगर, काश्मीरमधील बेमिना परिसरात अटक केली. दहशतवाद्यांकडून चार पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी दुसऱ्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी अनंतनागमध्ये विशेष चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
काश्मीरमधील अनंतनागमधील दुरू भागात सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. अजूनही दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. अनंतनागच्या दुरू भागातील कारीरीमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह संयुक्त कारवाईत शोध मोहीम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी (terrorist) सुरक्षा दलांवर गोळीबार (Firing) सुरू केला.
हेही वाचा: उष्णतेवर तज्ञांनी दिला गंभीर इशारा; २०२२-२६ या पाच वर्षांत...
सुरक्षा दलांनीही लगेच मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले. तसेच दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली नाही आणि गोळीबार (Firing) सुरूच ठेवला. या चकमकीत सुरक्षा दलांना आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title: Two Terrorists Killed Four Arrested Security Forces Srinagar Anantnag
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..