पुलवामामध्ये मोठी चकमक; जवान हुतात्मा तर...

वृत्तसंस्था
Tuesday, 23 June 2020

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येते आज (मंगळवार) सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून, जवान हुतात्मा झाला आहे. परिसर लष्कराने ताब्यात घेतला असून, शोध मोहिम सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येते आज (मंगळवार) सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून, जवान हुतात्मा झाला आहे. परिसर लष्कराने ताब्यात घेतला असून, शोध मोहिम सुरू आहे. या भागात अनेक दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे.

चीननंतर पाकला खुमखुमी; जवान हुतात्मा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा भागामध्ये दहशतवादी लपून बसले असून, मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून लष्कराला मिळाली होती. माहितीची अधारे लष्कराने स्थानिक पोलिस व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बंडजू गावात शोधमोहिम सुरू केली होती. बंडजू गाव चारही बाजूने घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू झाल्यानंतर जवांनांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर सीआरपीएफ जवान हुतात्मा झाला.

भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...

हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव सुनिल काळे असून, ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पानगांव हे त्यांचे गाव आहे. सुनिल काळे हुतात्मा झाल्याची माहिती समजल्यानंतर कुटुंबियांसह परिसरातील नागिरक दुःखात बुडाले आहेत.

दरम्यान, काश्मीर खोऱयात गेल्या 17 दिवसांमध्ये 32 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये 107 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील जडीबल भागात चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.

चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two terrorists killed in pulwama encounter crpf succumbed and attained martyrdom jammu kashmir