Udaipur Murder : आरोपींना जमावाकडून मारहाण; १० दिवसांची NIA कोठडी

Udaipur Murder accuse NIA custody Rajasthan
Udaipur Murder accuse NIA custody RajasthanUdaipur Murder accuse NIA custody Rajasthan

उदयपूर : जयपूर येथील राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने उदयपूर हत्याकांडात अटक केलेल्या मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद आणि त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना (accuse) १० दिवसांच्या एनआयए (NIA) कोठडीत पाठवले आहे. उदयपूर घटनेच्या निषेधार्थ वकिलांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालालच्या निर्घृण हत्येप्रकरणी एनआयए आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने आरोपींना शनिवारी (ता. २) जयपूरच्या एनआयए न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर केले. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन एटीएसच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) कार्यालयात पोहोचले.

Udaipur Murder accuse NIA custody Rajasthan
Amravati Murder : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा जणांना अटक

एनआयएने एटीएसकडून सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले. यानंतर कन्हैयालाल हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी (accuse) मोहम्मद रियाज अख्तारी व गौस मोहम्मद, त्यांचे सहकारी आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना एनआयए आणि एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आणि शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

२८ जून रोजी कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्य सरकारने विशेष संशोधन पथक (एसआयटी) स्थापन करून तपास सुरू केला होता. परंतु, यानंतर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. हत्येतील प्रमुख आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांनी २८ जून रोजी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या (Murder) केली होती. हत्येनंतर आरोपींनी इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

अमरावतीतही असाच खून

नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त टिप्पणीचे समर्थन केल्याने अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (५४) यांचा खून करण्यात आला. उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांची हत्या (murder) झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक (accuse arrested) केल्याची माहिती डीसीपी विक्रम साळी यांनी दिली आहे.

पोलिसांच्या सुरक्षेत आरोपींना मारहाण

कन्हैयालालची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले जात असताना संतप्त लोकांनी हल्ला केला. पोलिस आणि कमांडोच्या उपस्थितीत लोकांनी चपला व लात मारून मारहाण केली. आरोपींना पोलिसांच्या वाहनात बसवले जात होते तेव्हा पोलिसांच्या सुरक्षेदरम्यान लोक मारहाण करीत होते. एका आरोपीचा गळा पकडून मागून चापट मारण्यात आली, असे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com