जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

दिल्लीत या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. उमर खालिद हा JNUचा माजी विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांनी बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक केली आहे.

दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. उमर खालिद हा JNUचा माजी विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांनी बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुत्रांच्या माहितीनुसार, उमरला शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तसेच रविवारी लोदी कॉलनीत उमरला विशेष सेल कार्यालयात अजून चौकशीसाठी बोलावलं. नंतर रविवारी जवळजवळ 11 तास चौकशी केल्यानंतर उमर खालिदला अटक केली आहे.

पावसाळी अधिवेशन 2020 Live : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसह अन्य दिग्गज नेत्यांना श्रद्धांजली

यापुर्वी उमर खालिदला 31 जूलैला चौकशीसाठी बोलावला होतं. त्यावेळेस त्याचा मोबाईलही जप्त केला होता. रविवारी 11 तासांच्या चौकशीनंतर उमरला खालिदला अटक केली आहे. काही दिवसात पोलिस उमर खालिदवर चार्जशिटही दाखल करु शकतात. आज (सोमवारी) उमरला न्यायालयात आणलं जाणार आहे.

देश सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसोबत : PM नरेंद्र मोदी

कोण आहे विद्यार्थी नेता उमर खालिद?
उमरचे कुटुंब 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे गेले होते. उमर खलिद हा दिल्लीतील झाकिरनगर भागात राहायचा. त्याचे वडील एत उर्दु मासिक चालवायचे. जेएनयू विद्यापिठातून समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास विषयात एमए आणि एम- फिल केलं आहे. सध्या उमर जेएनयूतून पीएचडी करत आहे. 2016 मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद हा चर्चेचा विषय ठरला होता .

उमर खलिद आणि वाद...
उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बऱ्याच वेळी टीका केली आहे. तसेच जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपार्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोपही खालिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत मोठी शोकसभाही झाली होती. यातही खलिद सहभागी झाल्याचे सांगितलं जातंय. तसेच खलिदने वेळोवेळी काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umar Khalid is arrested bye Delhi Police