कुस्तीपटूंच्या आंदोलनाची जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल; थेट संघटना बरखास्तीचा इशारा! | Wrestler Protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestler Protest

Wrestler Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल; थेट संघटना बरखास्तीचा इशारा!

Wrestler Protest :  भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जवळपास महिनाभरापासून कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे.

रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. यासोबतच दिल्ली पोलिसांनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते.

दरम्यान, कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल जागतिक कुस्ती महासंघाने (United World Wrestling)  घेतली आहे. कुस्तीपटूंची सर्वोच्च संस्था UWW ने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याची धमकी दिली आहे. अनेक भारतीय कुस्तीपटू कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर खेळाडूंच्चा लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू मंगळवारी गंगा नदीवर आपली पदके टाकण्यासाठी पोहोचले होते, परंतु भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर सरकारला ५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.  

जागतीक कुस्ती महासंघाने एक निवेदन जारी केली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा तीव्र निषेध केला. २८ मे रोजी पोलिसांनी जंतरमंतर येथून १०० हून अधिक पुरुष व महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले होते. त्यांना सायंकाळी उशिरा सर्व महिला कुस्तीपटूंना सोडण्यात आले. त्यानंतर इतर कुस्तीपटूंना सोडण्यात आले.

 जागतिक कुस्ती महासंघाने म्हटले आहे की, नुकतीच घडलेली घटना चिंताजनक आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले ही बाब अधिक चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी ते महिनाभर आंदोलन करत होते, तिथे देखील प्रशासनाने कारवाई केली. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा UWW तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

ब्रिजभूषण यांच्याबाबत आतापर्यंत झालेल्या तपासावर देखील निराशा व्यक्त करण्यात आली आहे. UWW संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ४५ दिवसांच्या आत न घेतल्यास बरखास्त करण्याची धमकी देखील UWW ने दिली आहे.