"सपा सत्तेत आल्यास युपीतून होईल देशभरात दहशतवादाचा पुरवठा"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अखिलेश यादव यांच्यावर निशाणा
amit shah slashes on Akhilesh Yadav
amit shah slashes on Akhilesh Yadave sakal
Updated on

लखनऊ : समाजवादी पार्टी (Samajwadi Party) जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर निशाणा साधला. शहा यांच्याबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी देखील युपीत प्रचार सभा घेतल्या. तसेच भाजप सत्तेत आल्यास वर्षाला दोन मोफत गॅस सिलिंडर दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी इथल्या जनतेला दिलं. (UP Election 2022 SP govt comes to power UP will supply terrorism in India Amit Shah)

amit shah slashes on Akhilesh Yadav
घर पाडल्यामुळं आंदोलन करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना जिवंत जाळलं!

शहा म्हणाले, "जर सायकलचं (समाजवादी पार्टी) सरकार सत्तेत आलं तर उत्तर प्रदेशमधून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल" अखिलेश यादव यांच्या सरकारवेळी २,००० शेतकऱ्यांचा भुकेनं मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला. बांदा जिल्ह्यातील तिंदवारी विधानसभा मतदारसंघात ते बोलत होते.

युपीतून बाहुबलींचा नायनाट

रायबरेली इथं बोलताना शहा म्हणाले, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातून बाहुबलींचा नायनाट झाला असून तिथं आता केवळ बजरंगबली आहेत" त्याचबरोबर सपा, बसपा आणि कॉंग्रेसवर टीका करताना शहा म्हणाले, "या लोकांनी गरिबांच्या नावानं केवळ मतं मिळवली. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानानी गरिबांसाठी चांगलं काम कलेलं नाही"

वर्षभरात दोन गॅस मोफत देणार

दरम्यान, राजनाथ सिंह मनकापूर इथं बोलताना म्हणाले, "भाजप पुन्हा सत्तेत आली तर वर्षभरात दोन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. यांपैकी एक गॅस हा होळीला तर दुसरा दिवाळीसाठी दिला जाईल. तसेच ज्या विद्यार्थीनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतील त्यांना पदवीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना स्कूटी उपलब्ध करुन दिल्या जातील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com