esakal | रक्ताने लिहिलेल्या पत्रांसोबत 'कर्जमाफी फसवी' सांगणारी तब्ब्ल साठ हजार पत्र राज्यपालांकडे सुपूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

रक्ताने लिहिलेल्या पत्रांसोबत 'कर्जमाफी फसवी' सांगणारी तब्ब्ल साठ हजार पत्र राज्यपालांकडे सुपूर्त

रक्ताने लिहिलेल्या पत्रांसोबत 'कर्जमाफी फसवी' सांगणारी तब्ब्ल साठ हजार पत्र राज्यपालांकडे सुपूर्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीकडून आज दिवसभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तहसील कार्यकत्यांसमोर शेतकरी कर्जमाफी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदानावर देखील भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. या मुंबईतील आंदोलनात भाजपच्या बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे, आशिष शेलार याचसोबत अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

मोठी बातमी -  नाहीतर गुरं-ढोरं आणि पोरांसह 'मातोश्री'वर धडक देऊ...

यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील पन्नास हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेलेत. यामध्ये काही पत्र शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलीयेत. सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या आशयाची ही पत्र आहेत. भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही पत्र आणली आहेत. पुठ्ठ्याच्या अनेक बॉक्समधून ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्त केली गेलीत. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मोठी बातमी - अबब...! पोटात निघालं पावणेदोन कोटींचं 'हे' घबाड!

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस : 

 • महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे अशा आशयाची तब्बल पत्र ६० हजार पत्र राज्यपालांकडे देण्यात आली.   
 • भाजप कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजित सिंह राजे घाडगे यांनी ही पत्र आणलीत  
 • एकूणच राज्यसरकाने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.  
 • महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या यादीत २५ ते ३० टक्के देखील शेतकरी नाहीत.  
 • कोल्हापुरातील दोन गावात मिळून केवळ २०८ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झालेत.
 • कोल्हापुरतील पत्रांपैकी काही पत्र शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या रक्ताने लिहिलीत.

मोठी बातमी -  आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

 • राज्यपालांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं याबाबत मी स्वतः विनंती केली आहे 
 • सरकारने सांगितल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी दयावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. 
 • थेट लोकांमधून सरपंच न निवडता ग्रामपंचायीतून सरपंच निवडावा यासाठी आणलेलं बिल म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे. 
 • याबाबतची कोणतीही माहिती देण्यात अली नव्हती. 
 • घाईघाईत या सरकारने हा कायदा मंजूर करून घेतलाय, इतक्या घाईने एक महिन्याचं अधिवेशन असताना नियमबाह्य पद्धतीने सरकारने हे केलंय 

मोठी बातमी -  'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

 • महाविकास आघाडीने नियम पाळले नाहीत नाहीत. 
 • अशा कारवाईला राज्यपालांनी मान्यता देऊ नये, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे  

farmers lone wavier fadanavis submits sixty thousand letters governor

loading image