राज्यसभेत 10 उमेदवार बिनविरोध; भाजपची 8 जागांवर बाजी

rajya-sabha election bjp won 8 sp bsp one
rajya-sabha election bjp won 8 sp bsp one

नवी दिल्ली - राज्यसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून उत्तर प्रदेशात भाजपचे आठ तर समाजवादी पक्ष आणि बसपाच्या प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी नाव मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचं घोषित केलं. यासह इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत सुस्थितीत तर काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.

राज्यसभेच्या 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपणार आहे. यामध्ये तीन खासदार भाजपचे, चार समाजवादी पक्षाचे, दोन बसपा तर एका काँग्रेस नेत्याचा समावेश आहे. राज्यसभेत भाजपच्या 9 उमेदवारांचा विजय होण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी फक्त 8 उमेदवार उभा केले आणि एक जागा रिकामी ठेवली. भाजपच्या या खेळीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी ब्रिज लाल, नीरज शेखर, हरिद्वार दूबे, गीता शाक्य, बीएल वर्मा, सीमा द्विवेदी यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बसपाचे रामजी गौतम हे बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले. 

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या राज्यसभेच्या 11 जागांचा निकाल जाहीर होताच भाजपचे संख्याबळ सर्वाधिक झाले आहे. तर काँग्रेसची राज्यसभेतील निच्चांकी संख्या नोंदवली गेली आहे. सध्या भाजपकडे 92 जागा असून काँग्रेसकडे फक्त 38 जागा आहेत. एनड़ीएचे संख्याबळ 112 इतकं झालं असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी फक्त 10 जागा कमी आहेत. राज्यसभेत एकूण 245 जागा असून त्यापैकी 12 जागा राष्ट्रपती नियुक्त उमेदवारांसाठी असतात. इतर जागांवर निवडणूक घेतली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com