उत्तराखंडमधील मृतांची संख्या ५८ वर, १४६ जण बेपत्ता

चमोली - तपोवन बोगद्यात बचाव कार्य करणारे जवान.
चमोली - तपोवन बोगद्यात बचाव कार्य करणारे जवान.

तपोवन - उत्तराखंडमधील तपोवन ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात आज सलग दहाव्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरू होते. आज या बचाव पथकाच्या हाती आणखी दोन मृतदेह लागले. राज्यातील जलप्रकोपानंतर येथील ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेतील मृतांची संख्या ५८ वर पोचली असून अजून १४६ लोक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोगद्यातील स्थिती पाहता कोणी जिवंत असण्याची शक्यता तशी कमीच असली तरीसुद्धा बचाव यंत्रणा मात्र काही केल्या माघार घ्यायला तयार नाहीत.

सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बचाव पथकांच्या हाती एक मृतदेह लागला. दरम्यान बोगद्यात सापडलेल्या मृतदेहांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळे शवागार तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत अकरा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून त्यांना येथील शवागारात ठेवण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोककुमार यांनी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये येथील मदत आणि बचाव कार्य थांबविण्यात येईल असे विधान केल्याने खळबळ निर्माण झाली होती. यावर अशोककुमार यांना आज पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागले. ते म्हणाले की, ‘‘ जोशीमठ, रैणी आणि तपोवन येथील मदत आणि बचाव कार्य सुरूच राहील. यामध्ये स्थानिक लोक देखील सहभागी झाले आहेत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदत पोचत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य सुरूच राहील.’’ तत्पूर्वी अशोककुमार यांनी येथील या बोगद्यात अडकलेले लोक आता जिवंत सापडण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगत मदत आणि बचाव कार्य थांबविण्याचे संकेत दिले होते.

‘त्या’ तळ्यावर यंत्रणेची नजर
चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्यानंतर आलेल्या जलआपत्तीच्या पार्श्वभूमीवर ऋषीगंगा नदीमध्ये वरच्या भागात पाच ते सहा किलोमीटर उंचीवर एक तळे तयार झाले असून त्यावर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या जरी या तळ्याचा फारसा धोका नसला तरीसुद्धा भविष्यामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रातून येथे हे तळे निर्माण झाल्याची बाब उघड झाली होती.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com