Uttarakhand Glacier: बोगद्यात अजूनही अडकलेत ३५ मजूर; मृतांचा आकडा २८ वर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

आणखी दोघांचा मृतदेह सापडल्याने उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयामधील एकूण मृतांची संख्या २८ झाली आहे.

देहरादून Uttarakhand flash floods Updates- आणखी दोघांचा मृतदेह सापडल्याने उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयामधील एकूण मृतांची संख्या २८ झाली आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन पॉवर प्रोजेक्टच्या  एका बोगद्यात अडकलेल्या ३५ मजुरांना वाचवण्याचे काम सुरु आहे.  उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे. ग्लॅसिअर प्रलयामुळे झालेल्या भागातील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

कंगनाविरुद्ध तक्रार दाखल; 'ते' ट्विट पडलं महागात 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोवन साईटवर 1,900 मीटर लांब असलेल्या बोगद्यात कमीतकमी ३५ लोक अडकले आहेत. पुरामुळे येथील पाणी ७० फूट वाढले आहे. गाळ आणि कचरा साचल्याने  २० फूट रुंद असलेल्या बोगद्याचा मुख्य मार्ग ब्लॉक झाला आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.  

उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये रविवारी सकाळी जवळपास 10.30 वाजता नंदादेवी ग्लेशियरच्या कोसळण्याने धौलीगंगा नदीमध्ये अचानकच पूर आला आहे. या दुर्घटनेमध्ये एका जलविद्युत प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या जवळपास 1०० श्रमिक बेपत्ता आहेत. ग्लेशियर कोसळल्याने एका पॉवर प्रोजेक्टवर देखील याचा गंभीर परिणाम झाला. भारतीय सैन्यासमवेत अनेक दल बचाव कार्यात मदत करत आहेत. 

याबाबतचे फोटो स्पष्ट करत आहेत की धौलीगंगा आणि ऋषिगंगा नदीवरील धरम पूर्णपणे नष्ट झाले आहे. हा भाग राजधानी देहरादूनपासून जवळपास 280 किमी दूर आहे. तपोवनजवळील मलारी घाटाच्या सुरवातीलाच बनलेले दोन पूल देखील नष्ट झाले आहेत. जोशीमठ आणि तपोवनाच्या दरम्यानच्या रस्त्यावर याचा कसलाही परिणाम झाला नाहीये. प्रशासनाकडून लोकांना बचावकार्य देणे सुरु आहे. 

मुंबई हायकोर्टाकडून आयुर्वेदिक डॉक्टरची शिक्षा रद्द; ऑपरेशननंतर महिलेने गमावला...

दुर्घटनेनंतर सगळीकडे कचराच कचर दिसून येतो आहे. NTPC अधिकाऱ्यांनी या प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितलं की, तपोवन हायड्रो-इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये 520 मेगावॅट वीजेची निर्मिती सुरु होती. यासाठी 3 हजार कोटी रुपये गुंतवले होते. साईटवर काम करणारे जवळपास 170 कामगार बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. NDRF, SDRF, ITBP, सैन्य आणि वायुसेनेसमवेत अनेक मदतनीस दल बचावकार्य करत आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand flash floods Live updates CM Rawat conducts aerial survey