Nashik Accident News : उड्डाण पुलावर अपघातामुळे वाहनांच्या लागल्या रांगा

रविवार, ख्रिसमस अन खानदेश महोत्सव यामुळे शहरातील रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली.
Accidental vehicle on flyover
Accidental vehicle on flyoveresakal

Nashik Accident News : रविवार, ख्रिसमस अन खानदेश महोत्सव यामुळे शहरातील रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली.

तर, महामार्गावर गोविंदनगर समोरील उड्डाणपूलावर अपघात झाल्याने उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. (Queue of vehicles due to accident on flyover nashik news)

ख्रिसमस मुळे सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्या त्यातच आज रविवार यामुळे सायंकाळनंतर शहरात अचानक वाहनांची गर्दी वाढली तसेच ठक्कर डोम येथे खानदेश महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने येथे येण्यासाठी ही वाहनांची गर्दी झाली. परिणामी सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, गडकरी सिग्नल, त्रंबक नाका, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या राम रांगा लागल्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कायम राहिली.

Accidental vehicle on flyover
Nashik Accident News: खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर गोविंद नगर येथे अपघात झाल्याने वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस शाखा घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करेपर्यंत वाहनांच्या लांबच्या राम रांगा लागल्या होत्या त्याचा परिणाम महामार्गांवरील सर्विस रोडवरही दिसून आला.

Accidental vehicle on flyover
Nashik Accident News: ओझर येथे कारची ज्युपिटरला धडक; एकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com