अलर्ट राहणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचे विधान

मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन केले.
PM Modi
PM ModiSakal

नवी दिल्ली : सर्व पात्र मुलांचे लसीकरण (Kids Corona Vaccination) लवकरात लवकर करणे हे सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवावे लागतील. तसेच साथीच्या रोगाशी (Corona Pandemic) संबंधित आव्हान अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. देशातील काही भागांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. (PM Modi Meet With All States CM)

देशातील 96 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड लसीचा किमान एक डोस मिळाला आहे असे म्हणत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. तर 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85% लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा सांगत, मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये समान मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन केले.

PM Modi
महाराष्ट्र,बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट; इंधन दरवाढीवरून बैठकीतच मोदींचा टोला

कोविड संकटाचे व्यवस्थापन करूनही, इतर देशांच्या तुलनेत, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहण्याचे गरजेचे असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. शास्त्रज्ञ आणि तज्ञ मंडळींकडून कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येनंतर राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, त्यांच्या सूचनांवर आपल्याला काम करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणेदेखील आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com