'वंदे भारत' आता प्युअर व्हेज; IRCTC देणार सात्विकतेचं प्रमाणपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'वंदे भारत' आता प्युअर व्हेज; IRCTC देणार सात्विकतेचं प्रमाणपत्र

आम्ही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करुन अशा योजनापूर्ण रेल्वेचा तयार करण्याचा विचार करत आहोत.

'वंदे भारत' आता प्युअर व्हेज; IRCTC देणार सात्विकतेचं प्रमाणपत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्ली आणि कटरादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पूर्णत: शाकाहारी वातावरणात प्रवास करता येणार आहे. यामध्ये जेवणात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांचा समावेश नसणार आहे. स्वच्छतेसाठीची प्रोडक्ट, साबण इत्यादींमध्येसुद्धा मांसाहारी पदार्थ वापरले जाणार नाहीत. दरम्यान, भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन निगम यांच्याकडून प्रवाशांसाठी शुद्ध शाकाहारी हमी देणाऱ्या रेल्वेसाठी सात्विक कौसिंल ऑफ इंडिया यांच्याकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

हेही वाचा: नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान?

एका एनजीओने सात्विक कौंसिल इंडिया सोबतच्या एका कंत्राटी तत्वावर सांगितल्याप्रमाणे IRPTC जम्मु-काश्मीरपासून मार्गस्थ होणाऱ्या वंदे भारत सारख्या रेल्वेंतून वैष्णोदेवीपासून ते कटरापर्यंतच्या पवित्र देवस्थानांना जाणाऱ्या अनेक रेल्वेंना हे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, ही योजना रेल्वेला प्रमाणित करण्याची असून यात स्वयंपाकघराची सुविधाही दिली आहे, ज्यातून भविष्यात शुद्ध शाकाहारी आहाराची सुविधा दिली जाणारा आहे. आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, सात्विक कौंसिल ऑफ इंडियाच्या विश्लेषकानुसार वंदे भारतप्रमाणे वाराणसी येथील अजून १८ रेल्वेंमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.

सात्विकच्या एका अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, आम्ही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करुन अशा योजनापूर्ण रेल्वेचा तयार करण्याचा विचार करत आहोत. या सुविधेमुळे प्रवाशांना बाहेरील खाद्य मागवण्याचा त्रास कमी होईल आणि त्यांना प्रवासाचा आनंदही घेता येईल. ज्यामुळे ते शाकाहारी पदार्थांचा मनमुराद आनंद घेऊ शकतील. पर्यटकांमध्ये शाकाहारी आहाराच चाहता असणारा मोठा वर्ग आहे. ज्यांना या सुविधांची आवश्यकता असते. कारण शाकाहारी पर्यटनांचा आनंद घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचे प्रतिनिधित्व करणारा वर्ग असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच

loading image
go to top