‘मला निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देऊ द्या’, तिनं अमित शाहांना लिहिलं रक्तानं पत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिलंय.

दिल्ली ः निर्भयाच्या गुन्हेगारांना लवकरच फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. त्यांच्या फाशीसाठी तिहार तुरुंग प्रशासनाने तयारीही केली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय शूटर वर्तिका सिंगने निर्भयाच्या गुन्हेगारांना माझ्याकडून फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं असून, निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वर्तिकाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेली पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेश संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे.”

सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. या पाशवी अत्याचारानंतर अकरा दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर 29 डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली.

पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून, एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vartika wrote letter nirbhaya gang rape case should be executed by a woman