महामार्गावर पडला होता 12 तास मृतदेह; शेकडो वाहने गेली अंगावरून

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

- रस्ता ओलांडताना घडला हा प्रकार.

अमरोहा : महामार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू झाला. मात्र, हा मृतदेह जवळपास 12 तास महामार्गावरच पडून होता. त्यामुळे त्याच्या अंगावरून अनेक वाहनं गेली. ही घटना दिल्ली-लखनौ महामार्गावर घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधित व्यक्ती महामार्गावरील रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या वाहनाने धडक दिली होती तो वाहनचालक न थांबता पुढे निघून गेला. त्यानंतर सुमारे 12 तास मृतदेह महामार्गावरच पडून होता. त्यादरम्यान त्याच्या अंगावरून शेकडो वाहनं गेली. मृतदेहाच्या अक्षरश: चिंध्या झाल्या. घटनेच्या तब्बल 13 तासांनी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. 

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातील गरिबी हटणार

पोलिसांची अनेक वाहनं गेली

संबंधित व्यक्तीचा मृतदेह तब्बल 12 तास महामार्गावर पडून होता. मात्र, कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे याच मार्गावरून 10 ते 15 वेळा पोलिसांची वाहनं गेली. पण या मृतदेहाकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

मृतदेहाची ओळख पटविणे अवघड

मृतदेहावरून अनेक वाहनं गेल्याने मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले. अद्यापही संबंधिताची ओळख पटली नाही.

राज्यसभेसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रातील 7 जागा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles run over accident victim for 12 hours on Delhi Lucknow Highway