esakal | हे कसलं गुजरात मॉडेल? कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधूनच व्हेंटिलेटरची वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

Surat_Ventilator

रुग्णसंख्या वाढू लागल्याने व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते.

हे कसलं गुजरात मॉडेल? कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधूनच व्हेंटिलेटरची वाहतूक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सूरत : देशात गुजरात मॉडेलची चर्चा सुरू असताना आता याला आदर्श मॉडेल म्हणायचं का असा विचार करायला लावणारी घटना घडली आहे. कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियात या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. सूरत महानगरपालिकेच्या कचरा गाडीतून हे व्हेंटिलेटर नेण्यात येत होते, हे पाहिल्यानंतर नागरिकांनी डोक्याला हात लावला होता. 

रुग्णसंख्या वाढू लागली
गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्याचे सोमवारी दिसून आले. सलग दुसऱ्या दिवशी २८००हून अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यात ७२४ नव्या केसेस एकट्या सूरतमध्ये आढळल्याने प्रशासन खडबडून जागं झालं. 

जया बच्चन भरणार ‘तृणमूल’च्या प्रचारात रंग; ममतादीदींसाठी घेणार सभा​

रुग्णसंख्या वाढू लागल्याने व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. वलसाडमधून सूरतला ३४ व्हेंटिलेटरची कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून वाहतूक केल्याची बाब यावेळी समोर आली. व्हेंटिलेटर आणण्यासाठी सूरत महापालिकेने कचऱ्याचे ट्रक पाठवले होते. हे दिसत असतानाही वलसाड प्रशासनाने त्याच ट्रकमध्ये व्हेंटिलेटर भरून पाठवले. 

२०३६पर्यंत पुतीन सत्तेत राहणार; संविधानात केला फेरबदल​

कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून व्हेंटिलेटरची वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार समजल्यानंतर वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर.रावल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसरा राजीनामा; चंद्रकांत पाटील यांचा दावा​

दरम्यान, गुजरामध्ये कोरोना रुग्णसंख्येने सोमवारी दिवसभरात तीन हजाराचा आकडा ओलांडला आहे. २४ तासात ३१६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३ लाख २१ हजार ५९८ वर पोचली आहे. तर आतापर्यंत ४५८१ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये ७७३, राजकोटमध्ये २८३ तर बडोद्यात २१६ रुग्ण आढळले असून सूरत (७), अहमदाबाद (६), भावनगर आणि बडोद्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image