हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

दानिशने सांगितले, की सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होतो. या दहशतवाद्यांमुळेच मी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेत सहभागी झालो.

श्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी दानिश अहमद याने आत्मसमर्पण केल्याने, भारतीय लष्कराचा हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सबझार अहमद भट्ट याला नुकतेच भारतीय जवानांनी ठार मारले होते. याच्या अंत्यविधीवेळी दानिश अहमद उपस्थित होता. दानिश दगडफेक आणि ग्रेनेड हल्ला करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. अखेर त्याने हंदवारा पोलिस आणि 21 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

दानिशने सांगितले, की सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होतो. या दहशतवाद्यांमुळेच मी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेत सहभागी झालो. दानिश हा हंदवाडा जिल्ह्यातील कुलमगाम येथील तो रहिवाशी आहे. डेहराडून येथील महाविद्यालयातून त्याने बी. एससीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेतले आहे. हंदवाडा येथे 2016 मध्ये दगडफेक प्रकरणी पहिल्यांदा तो दिसला होता. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victory for Indian Army as top militant Danish Ahmed surrenders