VIDEO : स्टंट करताना उलटला ट्रॅक्टर; दिल्ली सीमेवर गोंधळाची परिस्थती

accident
accident

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आंदोलक शेतकरी आज ट्रॅक्टर रॅली काढत आहेत. नियोजित वेळेच्या आधीच शेतकऱ्यांनी या रॅलीस सुरवात केली आहे. तसेच अनेक दिल्लीच्या सीमेवरील अनेक बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडले आहेत. ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांनी याआधी दावा केला होता की, दिल्लीकडे येणारे सगळे मार्ग बंद आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या परेडमुळे पोलिसांच्या समोर ऐन प्रजासत्ताक दिनादिवशी शांतात राखण्याचं आव्हान असणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NDTV India (@ndtvindia)

तर या दरम्यान एक बातमी येतेय ती अशी चिल्ला बॉर्डरवर स्टंट करताना एक ट्रॅक्टर पलटला आहे. या पलटलेल्या ट्रॅक्टरमधून दबल्या गेलेल्या दोन लोकांना कसेबसे बाहेर काढलं गेलं आहे. या ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोघेजण ट्रॅक्टरला जोराने गोलगोल फिरवत होते. उपस्थितांनी स्टंट दाखवत होते. मात्र, या दरम्यान त्यांचा ट्रॅक्टर पलटला. या घटनेचा व्हिडीओ NDTV ने दिला असून तो व्हायरल झाला आहे. 

शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. बऱ्याच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. ट्रॅक्टर्समुळे रस्ते जाम झाले आहेत. मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. याला रोखण्यासाठी पोलिस लाठीचार आणि अश्रुधुराचा वापर करत आहेत.

आम्ही रिंगरोडच्या दिशेने जात आहोत. मात्र पोलिस आम्हाला अडवत आहेत. आम्ही त्यांना त्यांच्या वरिष्ठांशी बोलण्यासाठी 45 मिनिट दिले आहेत. आम्ही शांततेने परेड काढत आहोत. ते ज्या मार्गावरुन आम्हाला जायला सांगत आहेत, तो आधी ठरवलेला निर्धारित मार्ग नाहीये. पोलिस आम्हाला अडवत आहेत. असं किसान मजदूर संघर्ष कमिटीचे सतनाम सिंग पन्नू यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com