'हा' तरुण किन्नरच्या प्रेमात वेडा झाला अन्..

Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got marriedesakal
Summary

एका किन्नरनं पुरुषासोबत रितसर रुढी परंपरा पाळून लग्न केलं, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.

आपण अनेक अनोखे लग्न सोहळे बघितले असतील. कधी लग्नात अफाट खर्च केल्यामुळं, तर कधी नववधूला घ्यायला नवरदेव हेलिकॉप्टरनं आला. यासह अशा विविध कारणांमुळं लग्नसोहळा (Wedding Ceremony) लक्षात राहतो किंवा चर्चेचा विषय बनतो. मात्र, एका किन्नरनं पुरुषासोबत रितसर रुढी परंपरा पाळून लग्न केलं, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हा प्रकार बिहारच्या सिवान जिल्ह्यात घडलाय.

Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
भाजप प्रदेशाध्यक्षांना 14 दिवसांची पोलिस कोठडी; 'हे' प्रकरण आलं अंगलट

प्रेमासाठी किती कथा लिहिल्या, माहीत नाही. प्रेमावर अनेक सुविचारही लिहिले गेले. मात्र, सर्वात प्रसिद्ध म्हणजे, प्रेम हे 'आंधळं' असतं. प्रेमात पडलेल्या लोकांना जगाची पर्वा नसते. त्यांना फक्त त्यांच्या प्रियकराची काळजी वाटत असते. 'तो' आपल्या प्रियसीसोबत राहण्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्यास तयार असतो. असाच एक प्रकार बिहारच्या (Bihar) सिवान (Sivan) जिल्ह्यातून समोर आलाय. बिहारमधील सिवानमध्ये एका प्रियकरानं किन्नरसोबत प्रेमविवाह केलाय. या अनोख्या लग्नाबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरुय. आता त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
निवडणुकीपूर्वीच भाजप, बसपाला मोठा धक्का; खासदार-आमदारांचा 'सपा'त प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जिल्ह्यातील मैरवा बाजारच्या लंगडपुरा गावातील (Langadpura Village) आहे. या गावातील रहिवासी लुटन राजभर यांचा मुलगा विकास राजभर यानं गोपालगंज जिल्ह्यातील मीरगंज येथील एका किन्नरच्या घरी जाऊन त्याच्याशी लग्न केलंय. यादरम्यान इतर किन्नरांनी या नवविवाहित जोडप्याला भेटवस्तू देऊन सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वादही दिलाय. या प्रेमकथेबद्दल बोलायचं झालं, तर हे जोडपं सहा महिन्यांपूर्वी एकत्र भेटलं होतं. सुरुवातीला दोघांमध्ये बोलणं झालं आणि नंतर बघता-बघता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही जगाची पर्वा न करता एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विकासचे कुटुंबीय हे लग्न मान्य करायला तयार नाहीय. आपल्या मुलाच्या या निर्णयामुळं ते संतापलेले आहेत.

Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
Vikas Rajbhar and Kinnar Ritesh got married
मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप मंत्री-कॉंग्रेस खासदारात जोरदार राडा

लक्षवेधी बाब म्हणजे, विकास राजभर हा तरुण लग्न व इतर ठिकाणी ढोलकी वाजवायचा. याचवेळी किन्नर त्याच्या तालावर नाचायचे. यादरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. वधू बनलेल्या किन्नर रितेशनं (Kinnar Ritesh) सांगितलं की, आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळं आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी विकास राजभर (Vikas Rajbhar) म्हणाला की, मला रितेश आवडला. तो ट्रान्सजेंडर आहे, मला ठाऊक आहे; पण याचा मला काहीच फरक पडत नाही. विशेष म्हणजे, किन्नर रितेश सुरुवातीपासूनच मुलगा होता. मात्र, सुमारे वर्षभरापूर्वी त्यानं दिल्लीला जाऊन लिंग बदलून घेतलं आणि त्यानंतर विकास राजभरसोबत लग्न केलं. असाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी मनमाड शहरात घडला होता. किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com