Viral Video : "आधी मला १००० रुपये..."; शेतकऱ्याने केलं PM नरेंद्र मोदींच्या फोटोला किस

या व्हिडीओमधला वृद्ध शेतकऱी मोदींच्या फोटोवर हात फिरवताना आणि किस करताना दिसत आहे, तसंच तो काहीतरी बोलतही आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका होत असते. तर अनेकदा कौतुकही केलं जातं. मात्र पंतप्रधान मोदींचं कौतुक करतानाचा एका शेतकऱ्याचा एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वृद्ध शेतकऱ्याचा आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियातून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओमधला वृद्ध शेतकऱी मोदींच्या फोटोवर हात फिरवताना आणि किस करताना दिसत आहे.

या शेतकऱ्याने मोदींच्या फोटोशी कन्नड भाषेतून संवादही साधला आहे. "आधी मला १००० रुपये मिळत होते. तुम्ही आणखी ५०० देण्याचं ठरवलं होतं. तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला आमची घरं हिरवीगार हवी आहेत. तुम्ही आमच्या आरोग्यासाठी ५ लाख रुपये देऊ असं सांगितलं होतं. मी तुमच्या चरणी नतमस्तक होत आहे. तुम्ही नक्की विजयी व्हाल."

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडिया युजर्सने कमेंट्सही केल्या आहेत. मोदीजी जनतेच्या मनात आहे, हेच सत्य आहे, कोट्यवधी जनतेचा आशीर्वाद मोदींच्या पाठीशी आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com