

Naval Personnel murder girlfriend
ESakal
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित भारतीय नौदल जवानाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या शरीराचे पाच तुकडे केले. त्यापैकी तीन फ्रिजमध्ये लपवले आणि उरलेले दोन जाळून टाकले. पोलिसांनी आरोपी नौदल जवानाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आता याबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.