
'हे' आहेत भारतातील सर्वात कॉमन पासवर्ड; तुमचाही सेम असेल तर तात्काळ बदला
इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. आज लहानांपासुन मोठ्यापर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे. मोबाईलच्या माध्यमातुन आपण सहजपणे फेसबुक, वॉट्सअॅपवर, ई-मेल द्वारे संवाद साधु शकतो पण आपण साधलेला संवाद,आपण शेअर केलेले फोटो, सोशल मीडिया अकाऊंट किंवा ऑनलाईन बँक कार्ड सुरक्षित आहे का?
सुरक्षिततेसाठी आपण सहसा पासवर्ड हा सर्वात महत्त्वाचा पैलूचा वापर करतो. सोशल मीडिया अकाऊंट किंवा ऑनलाईन बँक कार्ड किंवा अन्य बाबींसाठी आपण पासवर्ड वापरतो,हे खरे पण पासवर्डच्या बाबतीत आपण भारतीय अत्यंत निष्काळजीपणाने वागतो,हे तितकेच खरे आहे. पासवर्डच्या आपल्या निवडीबाबत तुम्ही जाणाल तर तुम्ही पण थक्क व्हाल.
NordPass ने जगभरातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे टॉप 200 पासवर्ड समोर आणले. यात सर्व विकसित आणि विकसनशील राष्ट्रांचा समावेश आहे. तर यात महत्त्वाचे की या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. सर्वाधिक वापरल्या जाणार्या पासवर्ड पैकी 123456 हा पासवर्ड 2.50 लाख युजर्सचा आहे तर 123456789 हा पासवर्ड जगभरातील जवळपास एक लाख युजर्स वापरत आहेत.
कमजोर पासवर्ड डेटा चोरी किंवा आर्थिक नुकसानाला कारणीभुत असु शकते.भारतात, 1.7 लाखांहून अधिक लोक ‘PASSWORD हा शब्द पासवर्ड म्हणुन वापरतात तर जवळपास 1.10 लाख लोक 12345 हा पासवर्ड वापरतात.
भारतीतात सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड खालीलप्रमाणे-
1: password
2: 12345
3: 123456
4: 123456789
5: 12345678
6: india123
7: 1234567890
8: 1234567
9: qwerty
10: abc123