'जम्मूच्या खोऱ्यात आता एकही 'टॉप कमांडर' नाही, वर्षभरात 44 दहशतवाद्यांचा खात्मा' I Jammu Kashmir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu and Kashmir Director General of Police Dilbagh Singh

'पाकिस्तानी एजन्सींनी गेल्या 30 वर्षांत इथं खूप रक्तपात केला आहे.'

Jammu Kashmir : 'जम्मूच्या खोऱ्यात आता एकही 'टॉप कमांडर' नाही, वर्षभरात 44 दहशतवाद्यांचा खात्मा'

जम्मू काश्मीर : जम्मूच्या खोऱ्यात आता दहशतवाद्यांचा कोणताही 'टॉप कमांडर' नाहीये. इथं वर्षात आम्ही 44 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तरुणांसह स्थानिक लोकांच्या पाठिंब्यामुळं दहशतवाद सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे, असं स्पष्ट मत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग (Dilbagh Singh) यांनी व्यक्त केलं.

दिलबाग सिंग म्हणाले, आता इथं कोणताही टॉप कमांडर शिल्लक नाहीये. आम्ही या वर्षात 44 टॉप कमांडर मारले आहेत आणि आता आम्हाला आणखी टॉप कमांडर शोधायचे आहेत. जम्मूच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक वगळता दहशतवाद्यांचा सफाया करण्यात आला आहे. उर्वरित भागांचाही नायनाट केला जाईल. जम्मूमध्ये तीन-चार दहशतवादी (Terrorist) राहिलेल्या एका जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्व जिल्हे दहशतमुक्त आहेत. तिथंही कारवाई केली जात आहे.

हेही वाचा: Himachal : प्रतिभा सिंहांना मागं टाकत CM पदाच्या शर्यतीत सुखविंदर यांनी मारली बाजी; जाणून घ्या 7 मुख्य कारणं

जम्मू-काश्मीरचे डीजीपी पुढं म्हणाले, काश्मीरमधील दहशतवादाला पाठिंबा देणारी इको-सिस्टम नष्ट करण्याचं काम केलं जात आहे. बंदूक उचलणाऱ्यांवर लवकरात लवकर मारलं जाईल. आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त सक्रिय आहोत. येथील वातावरण बिघडवण्याचा पाकिस्तानचा (Pakistan) डाव पोलीस सुरक्षा दल हाणून पाडत आहे. दहशतवाद पुन्हा एकदा खालच्या पातळीवर पोहोचला आहे. आम्ही तरुणांचं समुपदेशन करून त्यांना सांगत आहोत की, 'पाकिस्तानी एजन्सींनी गेल्या 30 वर्षांत इथं खूप रक्तपात केला आहे. आज त्याविरोधात काम करण्याची गरज आहे.'