Weather Update : आज 'या' 15 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून अलर्ट जारी

सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे.
Weather Update
Weather Updateesakal
Summary

सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे.

नवी दिल्ली : सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ट्विटव्दारे इशाराही देण्यात आला आहे. विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात 22 सप्टेंबर आणि मध्य प्रदेशात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

याशिवाय IMD नं ट्विटव्दारे सांगितलंय की, 22 सप्टेंबर रोजी पूर्व राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, 22 ते 24 दरम्यान अरुणाचल प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान आसाम आणि मेघालयात पावसाची शक्यता आहे. तर आज नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

Weather Update
Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार

तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये 2-3 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट अहवालानुसार, पुढील चार ते पाच दिवस दिल्ली आणि एनसीआरमध्ये हलका पाऊस सुरू राहणार आहे. गेल्या 24 तासांत दक्षिणपूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस पडला आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. तर, आज मध्य महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

Weather Update
देशभरात PFI च्या अनेक ठिकाणांवर NIA, ED ची मोठी कारवाई; 100 हून अधिक लोकांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com