
BJP and TMC MLAs clash during a heated session in the West Bengal Assembly, sparking political tensions.
esakal
Political Tensions Rise Between BJP and TMC in Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत आज (गुरूवार) प्रचंड गोंधळ उडाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधातील भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान भाजपचे मुख्य प्रतोद आमदार शंकर घोष यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं.
प्राप्त माहितीनुसार बंगाली स्थलांतरितांवरील कथित अत्याचारांशी संबंधित सरकारी ठरावावरील चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठरावावर बोलणार इतक्यात भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलायला सुरुवात करताच, विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी टीएमसी आमदारांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि सभागृहाचे वातावरण तापले.
विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित केले. परंतु घोष यांनी सभागृह सोडण्यास नकार दिला. त्यानंतर मार्शल बोलावण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. या गोंधळात शंकर घोष यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णवाहिकेने रूग्णालयात हलवण्यात आले. तर भाजपच्या आणखी चार आमदारांनाही निलंबित करण्यात आले. बंकिम घोष, अशोक दिंडा, अग्निमित्रा पॉल आणि मिहीर गोस्वामी या चार भाजप आमदारांना निलंबित केले गेले आहे.
यापाठोपाठ भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनाही घोषणाबाजी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आणि सभापतींनी महिला मार्शलना बोलावून त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. तसेच, विरोधकांनी आरोप केला की गोंधळादरम्यान सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. मात्र, या आरोपाची पुष्टी होऊ शकली नाही.
यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप आमदारांच्या वर्तनाचा निषेध केला आणि म्हणाल्या की, ते एका गंभीर मुद्द्यावरील चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगाली स्थलांतरितांच्या स्थितीबाबत सरकारचा प्रस्ताव खूप महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्षाचा दृष्टिकोन दुर्दैवी आहे. तसेच भाजप स्थलांतरितांवरील हल्ल्यांवरील विधानसभेतील चर्चेला विरोध करत आहे, कारण अशा घटना भाजपशासित राज्यांमध्ये घडत आहेत. भाजपची हुकूमशाही आणि वसाहतवादी मानसिकता आहे. असंही ममता बॅनर्जींनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.