भाजपने 'सबका साथ' नाही 'सबका सर्वनाश' केला; ममता बॅनर्जी भडकल्या!

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

सोमवार आणि मंगळवार या दोन लागोपाठ दिवशी आंदोलन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बुधवारीही हावडा मैदानावरून रॅली काढली.

कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून आक्रमक झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता.18) पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेत ''तुम्ही हा कायदा पश्‍चिम बंगालमध्ये कसा लागू करता ते मी पाहते. भाजपने 'सबका साथ, सबका विकास' नाही, तर सबका सर्वनाश केला आहे,'' अशी घणाघाती टीका केंद्र सरकारवर केली आहे. 

- #StreetDancer : वरुण-श्रद्धाच्या 'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर एकदा पाहाच!

सोमवार आणि मंगळवार या दोन लागोपाठ दिवशी आंदोलन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बुधवारीही हावडा मैदानावरून रॅली काढली. या रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

- आता रेशन दुकानावर स्वस्त दरात मिळणार मटण, चिकन, अंडी अन् मासे !

यावेळी ममता म्हणाल्या, की केंद्रीय गृहमंत्र्यांचे काम हे आग विझवण्याचे असते. मात्र, नागरिकत्व कायद्यावरून त्यांनी देशामध्ये आग लावण्याचे काम केले आहे. कायद्यात आवश्‍यक बदल करा आणि देशाला जळू देऊ नका, असे आवाहन त्यांनी शाह यांना केले आहे. 

- ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात

तसेच, भाजप संपूर्ण देशाला ताब्यात घेऊन पाहत आहे. पण आम्ही तस होऊ देणार नाही. अमित शहा म्हणतात की, आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग तुम्ही आधार कार्डसोबत सर्व काही का जोडत आहात, असा सवालही ममतांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal CM Mamata Banerjee criticized Home Minister Amit Shah about CAA and NRC