#StreetDancer : वरुण-श्रद्धाच्या 'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर एकदा पाहाच!

टीम ई-सकाळ
Wednesday, 18 December 2019

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर युद्ध रंगलेले आपण अनेकवेळा पाहिले आहे.

बॉलिवूडमध्ये 'चॉकलेट बॉय' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर बुधवारी (ता.18) प्रदर्शित झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डान्सवर आधारित असणाऱ्या चित्रपट मालिकेतील हा तिसरा चित्रपट आहे. एबीसीडी आणि एबीसीडी-2 ला मिळालेल्या दमदार यशानंतर या शृंखलेतील तिसरा चित्रपट स्ट्रीट डान्सर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

- 'दिल दोस्ती दुनियादारी'मधील 'ही' अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात!

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर युद्ध रंगलेले आपण अनेकवेळा पाहिले आहे. आताही या दोन देशांमध्ये डान्स फ्लोअरवर कसे युद्ध रंगते? हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 

- 'छपाक' गर्ल लक्ष्मी अग्रवाल आहे तरी कोण ?

ट्रेलर रिलिज झाल्यानंतर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी सुपरहिट सिनेमा अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत 'ओ साकी साकी' फेम नोरा फतेही या चित्रपटात डान्सचा तडका लावणार आहे. तसेच प्रभुदेवाही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असल्याने त्याच्याही डान्सची झलक फॅन्सना पाहायला मिळणार आहे. 

- 'असे फोटो तु टाकू नकोस' प्राजक्ता माळीवर नेटकरी नाराज !

'स्ट्रीट डान्सर'मध्ये वरुण पंजाबी डान्सरच्या लूकमध्ये दिसत आहे, तर श्रद्धाने पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे. सुरवातीला रुल ब्रेकर्स असे या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता स्ट्रीट डान्सर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street Dancer Trailer Varun Dhawan and Shraddha Kapoor take dance battle between India and Pakistan at new level