Lockdown : नागरिकांनो घाबरू नका; महापालिकेच्या 'या' हेल्पलाईन आहेत ना!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

लॉकडाऊनच्या कालावधीत अन्न, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज नागरिकांना भासू शकते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

बालेवाडी : वेगाने वाढणाऱ्या करोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सेवा मिळविण्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने खास हेल्पलाईन सुरू केल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. 

- Corona Effect : शहरात भाज्यांचा तुटवडा; हिरवी मिरची १६० रुपये प्रति किलो!

कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत पुणेकर नागरिक अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहू नयेत, याची खबरदारी पुणे महापालिका घेत आहे.

- WHO ने केले भारताचे कौतुक, लढाऊ वृत्तीला सलाम!

लॉकडाऊनच्या कालावधीत अन्न, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज नागरिकांना भासू शकते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत आपल्या भागातील संबंधित सेवा उपलब्ध नसल्यास नागरिकांना त्या सेवा कुठे उपलब्ध होतील याबाबतची माहिती देणे तसेच त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आवश्यक ती मदत प्रशासकीय पातळीवर केली जाईल, अशी ग्वाही अग्रवाल यांनी दिली.

- Breaking : आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून काढा पैसे; तेही चार्जेसविना!

या अनुषंगाने जीवनावश्यक सेवांबाबत मदत हवी असल्यास नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक :

- 020-25506800
- 020-25506801
- 020-25506802
- 020-25506803
- 020-25501269


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC has launched special helplines for citizens in Lockdown situation