esakal | ग्रीसला अवघ्या एका वर्षांत राफेल; भारताला आठ वर्षे का?
sakal

बोलून बातमी शोधा

Rafale

ग्रीसची वायूसेना आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारानुसार फ्रान्सकडून 12 सेंकड हँड आणि नवीन सहा राफेल विमाने देण्यासंदर्भात हा करार आहे.

ग्रीसला अवघ्या एका वर्षांत राफेल; भारताला आठ वर्षे का?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

फ्रान्सने युरोपीय देशांसोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत फ्रान्स 18 राफेल लढाऊ विमान ग्रीस देशाला देणार आहे. यात विशेष गोष्ट अशी आहे की, पहिले राफेल विमान  हे करारानंतर ग्रीसला एका वर्षाच्या आतच मिळेल. आता हा प्रश्न उपस्थित होतोय की फ्रान्स असा पक्षपातीपणा का करत आहे? भारताने 36 राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत करार केला होता. भारताला पहिले विमान मिळायला फ्रान्सने तब्बल 8 वर्षे लावले होते. भारत हा फ्रान्सचा मोठा ग्राहक आहे तर भारताला प्राधान्य द्यायला हवं मिळायला हवी पण फ्रान्सकडून तसं होताना दिसत नाही. 

ग्रीसची वृत्तसंस्था पेंटापोस्टँगमाच्या वृत्तानुसार ग्रीसची वायूसेना आणि फ्रान्स यांच्यात करार झाला आहे. फ्रान्सकडून 12 सेंकड हँड आणि नवीन सहा राफेल विमाने देण्यासंदर्भात हा करार आहे. परंतु, ही सेकंड हँड विमाने किती जुने आहेत, याबाबत स्पष्टपण माहिती देण्यात आलेली नाही. करारांची औपचारिकता पुर्ण झाल्यावर लगेचच सहा महिन्यात पहिले राफेल विमान ग्रीसला मिळणार आहे. भारताला लवकर राफेल का मिळाले नाही आणि ग्रीसला इतक्या कमी वेळात राफेल कसे मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित करताना फ्रान्सच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा - भारतात आणखी एका राज्याच्या निर्मितीची मागणी; शिष्टमंडळ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीला

ग्रीसला प्राधान्य का?
काही आठवड्यांपूर्वी ग्रीस आणि फ्रान्स यांच्यात करार झाला होता त्यानुसार असं ठरलं होतं की, यावर्षीच्या शेवटापर्यंत सगळी कागदपत्रे तयार होतील. जर सगळं काही व्यवस्थित झालं तर 2021 च्या जूनपर्यंत पहिले राफेल विमान ग्रीसला मिळू शकते. खरंतर ग्रीस राफेलबाबत घाई आहे. त्यांचा शेजारी देश तुर्कीसोबत युद्धाची शक्यता असून त्यांच्यात कधीही युद्ध भडकू शकतं अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ग्रीसला राफेलच्या खरेदीची घाई आहे.

भारतासोबतचा राफेल करार

भारताने 2008 साली राफेल कराराचा विचार केला होता.  बोईंग, राफेल, टायफून, एफ 21, मिग 35 आणि जेएएस 39 ग्रिपेन या सर्व पर्यांयासोबतच 2012 मध्ये भारताने राफेलचा करार केला होता. 2012 पासून राफेल करार खूपच हळू गतीने झाला. 2015 मध्ये 36 राफेलबाबत करार मान्य झाला. 2016 मध्ये 7.87 अब्ज युरो म्हणजे जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. याचा अर्थ 2017 मध्येच भारताला पहिले राफेल मिळायला हवे होते. मात्र राफेल भारतात पोहोचायला 2020 उजाडले. पुढचे राफेल यायला नोव्हेंबर महिना लागेल. यापद्धतीने फ्रान्सकडून भारताला करारानुसार सर्व राफेल मिळायला आणि ती वापरात येण्यासाठी 2023 हे वर्ष उजाडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा - ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं

भारताला राफेल द्यायला उशीर का?

एकीकडे ग्रीसला एका वर्षात राफेल देण्याची तयारी असताना भारताला मात्र इतका उशीर का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताचा फ्रान्ससोबतचा राफेलसाठीचा करार 2012 पासून वादात अडकला आहे. संसदेथ यावरून अनेकदा गदारोळ झाला आहे. याच्या खरेदीत गैरव्यवहाराचे आरोपही विरोधकांनी सरकारवर केले आहेत. या सगळ्या गदारोळात राफेलची पहिली तुकडी 2020 मध्ये भारतात पोहोचली.