
1996 च्या आधी 1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो वॉटरमार्कच्या स्वरुपात वापरला जात होता. तो नोटेच्या डाव्या बाजुला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक नोटेवर गांधीजींचा फोटो छापला जातो.
भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत भारतात चलनी नोटांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2016 मध्ये तर नोटबंदीने 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या आणि त्यानंतर 10 रुपयांपासून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. मात्र गेल्या काही वर्षांत नोटांवर असलेलं महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे चित्र बदललं नाही. गांधीजींचा हा फोटो नोटेवर 1996 मध्ये आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर 5, 10, 20, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. दरम्यान तोपर्यंत अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आणि नोटेच्या एका बाजूला खाली अशोक स्तंभ छापला.
1996 च्या आधी 1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो वॉटरमार्कच्या स्वरुपात वापरला जात होता. तो नोटेच्या डाव्या बाजुला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक नोटेवर गांधीजींचा फोटो छापला जातो. माहितीच्या अधिकारा अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, 1993 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेच्या उजव्या बाजुला महात्मा गांधींचा फोटो छापण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. गांधीजींच्या फोटोवरून अनेकदा प्रश्न विचारले गेले की इतर स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो का छापले नाहीत.
हे वाचा - स्वातंत्र्याच्या 40 वर्षे आधी परदेशात फडकावला होता भारताचा झेंडा
भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. विविध राज्ये, भाषा, प्रादेशिक अस्मिता आहे. या देशात महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं संबोधलं जातं. स्वातंत्र्य लढाईवेळी गांधीजी देशाचा चेहरा होते आणि त्यामुळेच त्यांच्या फोटोबाबत एकमत झाले. कारण इतर स्वातंत्र्य सैनिकांबाबत प्रादेशिक वाद निर्माण होण्याची शक्यता होती. यासाठीच गांधीजींचा फोटो छापण्याचा निर्णय घेतला गेला.
नोटेवर गांधीजींच्या चित्रावरून याआधी जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारला होता तेव्हा तत्कालीन अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं होतं. अरुण जेटली म्हणाले होते की, रिझर्व्ह बँक इंडियाच्या पॅनलनं गांधीजींच्या ऐवजी इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्याचा फोटो न छापण्याचा निर्णय घेतला आहे. कारण महात्मा गांधी यांच्याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही.
हे वाचा - तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?
महात्मा गांधींचा नोटेवर असलेला फोटो हा पोर्ट्रेट असल्याचं वाटतं. मात्र हा फोटो गांधीजींच्या एका फुल साइज फोटोवरून घेण्यात आला आहे. 1946 साली हा फोटो लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेन्स व्हिक्ट्री हाउसमध्ये आले होते तेव्हा टिपण्यात आला होता.
Web Title: Why Only Gandhiji S Photo Indian Currency
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..