काय सांगता 'कोरोना वडा'! बनवणारा जोमात, पाहणारे कोमात

'कोरोना वडा' इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे
Coronavirus Shaped Vada
Coronavirus Shaped Vadaesakal
Summary

'कोरोना वडा' इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे

जेव्हापासून कोरोना (Corona) व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे, तेव्हापासून जगातील प्रत्येकजण त्रस्त आहे. ही वेगळी बाब आहे की काही क्रिएटिव्ह लोकांनी व्हायरसच्या दिसण्यात देखील क्रिएटिव्ह दाखवली आहे. 2020 मध्ये कोलकाता येथील एका दुकानदाराने कोरोना संदेश स्वीट (Corona Sandesh Sweet) नावाची मिठाई बनवली होती, तिथे आता एका महिलेने कोरोना वडा (Coronavirus Shaped Vada) बनवला आहे, जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिसायला, हा वडा प्रोटीन स्पाइक्स असलेल्या कोरोना विषाणूच्या चित्रांसारखा आहे. जो महिलेने तांदूळ आणि बटाट्यापासून तयार केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण त्याचा आकार अगदी कोरोना व्हायरससारखा आहे. ती महिला कोरोना वडा कसा बनवतेय हे पाहण्यासाठी तुम्हीही हा व्हिडिओ (Video) जरूर पहा.

कोरोना वडा पाहून मन थक्क होईल

Mimpi नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कोरोनाच्या आकाराचा वडा (Coronavirus Shaped Vada) बनवताना दिसतेय. व्हायरल व्हिडीओमध्ये ती तांदळाचे पीठ मळून घेते आणि नंतर बटाट्यामध्ये कांदे-टोमॅटो टाकून सारण तयार करते. यानंतर, हे सारण पिठात भरून, ती महिला कच्च्या तांदूळाने ते कोट करते आणि वाफेवर चांगले शिजवते. जेव्हा वडा शेवटी बाहेर येतो तेव्हा त्यावरील तांदूळ कोरोना विषाणूसारखे दिसतात.

लोकांनी दिल्या रंजक प्रतिक्रिया

हा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) शेअर करत युजरने कॅप्शन लिहिले आहे- कोरोना वडा, भारत की नारी सब पर भारी. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला असून ही डिश पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे स्वादिष्ट दिसत असले तरी त्याचे स्वरूप कोरोनासारखे असल्याने लोक विचित्र सांगत आहेत. यावेळी एका यूजरने लिहिले आहे की, - जेव्हा कोरोना होईल तेव्हा कोरोना वडा बनवा, तर दुसरा यूजर म्हणतोय- अशाप्रकारे कोरोनाला हरवले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com