राजकारणातील महिला सर्वाधिक ट्रोल

Women
Women

नवी दिल्ली - सोशल मीडियाचे एक व्यासपीठ असलेले ट्‌विटर हे भारतीय राजकारणातील महिलांसाठी घातक ठरत आहे. याचे कारण म्हणजे या समाजमाध्यमावरून त्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण ‘ॲमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ या संस्थेने ताज्या अभ्यासातून नोंदविले आहे. 

प्रत्येक सात ट्विटपैकी एका ट्विटमध्ये हे त्यांच्यासाठी त्रासदायक आणि त्यांची बदनामी करणारे असते. धमक्‍या, लिंगभेद तसेच धर्म, जात, वर्णद्वेषासंबंधीचा मजकूर अशा ट्‌विटमध्ये असतो, असे ‘ॲमेनेस्टी इंडिया’च्या अहवालात म्हटले आहे. मार्च ते मे २०१९ मध्ये ९५ भारतीय राजकारणी महिलांना त्रासदायक ठरणारी दहा लाख ट्विट पोस्ट करण्यात आली. याचाच असा की दररोज सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत साधारणपणे प्रत्येक महिला नेत्याबद्दल ११३ वाईट ट्विट केले गेले. ९५ महिलांच्या एकूण ट्विटमध्ये या ट्विटचे प्रमाण १३.८ टक्के आहे. हे सर्व ट्विट त्रासदायक आणि बदनामीकारक या प्रकारात मोडणारे आहेत. यातील प्रत्येक पाचव्या ट्विटमध्ये लिंगभेद आणि स्त्रीद्वेष डोकावतो. मुस्लिम महिला राजकारणी किंवा मुस्लिमधार्जिण्या अशी ओळख असलेल्या महिला नेत्यांबद्दल अन्य धर्मीयांपेक्षा ५५.५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट केली गेली आहे, असे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मागासवर्ग जातींमधील महिला नेत्यांवरील ५९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट हे जातीवर आधारित टीकेची आहेत.

‘ट्रोल पॅट्रोल इंडिया - एक्‍सपोझिंग ऑनलाइन ॲब्युज फेस्ड बाय वुमेन पॉलिटिशन्स इन इंडिया’ अशा शीर्षकाने हे संशोधन सर्वेक्षण, उपलब्ध माहिती आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्याने केले असल्याचे ‘ॲमेनेस्टीने सांगितले. सुमारे ९५ महिला नेत्यांची २०१९मधील तीन महिन्यांच्या काळातील १.१४ लाख ट्‌विटचा अभ्यास केला असता त्यातील ७० लाख ट्‌विट त्यांच्या बदनामीची आहेत, असे सांगण्यात आले.

‘ॲमेनेस्टी’ने हे निष्कर्ष नोव्हेंबर २०१९ मध्ये ट्‌विटरला पाठविले आहेत. चर्चेपासून फारकत घेणारे, बदनामीकारक आणि ‘स्पॅम’पासून मुक्त ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ‘ट्विटर’ने स्पष्ट केले आहे. मात्र, महिला राजकारणी ज्या प्रकारे ट्रोल झाल्या आहेत, त्यावरून महिला हक्कांचा आदर करण्यात ‘ट्‌विटर’ अपयशी ठरले असल्याची टीका ‘ॲमेनेस्टी’ने केली आहे.

ट्विटरवर महिलांची सातत्याने आणि कठोरपणे बदनामी केली जाते. याचा परिणाम म्हणजे यावर कायमच मौन बाळगण्यात येते.
- अविनाश कुमार, कार्यकारी संचालक, ॲमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com