Women Safety: महिलांनो, Night Shift मध्ये काम करताय? मग या गोष्टींबाबत आजच व्हा सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Safety

Women Safety: महिलांनो, Night Shift मध्ये काम करताय? मग या गोष्टींबाबत आजच व्हा सावध

Safety Tips: समाजामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनाही सर्वच स्तरांत समानतेचा दर्जा देण्यात आलाय. पुरुषांप्रमाणे अनेक महिलाही त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आज नाईट शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. काही कार्यालयांमध्ये मात्र याऊलटही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करता अनेक कार्यालयांमध्ये महिलांना उशीरा रात्रीपर्यंत काम करण्याची परवानगी नसते.

बरेचदा नाईट शिफ्टमध्ये काम करण्याऱ्या महिला उशीरा रात्रीपर्यंत जाण्यासाठी कॅब हा पर्याय निवडतात. ही सोय शक्यता ऑफिसकडूनच असायला हवी. कारण अनोळखी वाहकचालकासोबत मध्यरात्री प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे तुम्ही उशीरा रात्री घरी जाणारे असेल किंवा प्रवासादरम्यान तुम्ही स्टेशन, विमानतळावरून एकटेच घरी परतत असेल तर अशा वेळी काही महत्वाच्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

हेही वाचा: महिलांसाठी 11 Safety Tips; प्रत्येक वाईट परिस्थितीत मिळेल मदत

नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी महत्वाच्या टीप्स

महिलांसाठी आवश्यक असणारे सगळे हेल्पलाईन नंबर्स तुमच्याजवळ सेव्ह असावे.

याशिवाय उशिरा काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने त्यांच्या कार्यालयातील किमान काही विश्वासपात्र सहकाऱ्यांचा नंबर त्यांच्या स्पीड डायलवर ठेवावा. हे तुम्हाला संकट काळात तुरंत संपर्क करण्यासाठी महत्वाचे ठरेल.

हेही वाचा: India's Most Beautiful Women : सौंदर्य असं की बघता बघतच राहाल

कायम अलर्ट झोनमध्ये राहा. कितीही थकवा आला असला तरी तुमच्या सुरक्षिततेसाठी कृपया उशीरा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांनी कॅबमध्ये झोपणे टाळावे. तसेच या दरम्यान फोनद्वारे तुमच्या आप्तस्वकियांच्या संपर्कात राहावे. तुमच्याजवळ कृपया पेपर स्प्रे जवळ ठेवा.

ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या पुरुषाला घेऊन असुरक्षित वाटत असेल तर गप्प बसू नका. लगेच तुमच्या वरिष्ठांना याबाबत कळवा.

उशीरा रात्री कारमध्ये असताना कॅब ड्रायव्हर तुम्हाला शॉर्टकटने नेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला साफ नकार द्या.