महिलांसाठी 11 Safety Tips; प्रत्येक वाईट परिस्थितीत मिळेल मदत

महिलांनाही विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते.
Womens Safety Tips
Womens Safety Tipsesakal
Summary

महिलांनाही विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते.

आजच्या समाजात महिला (Women) प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. यामुळे महिलांनाही विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. मग ते रात्री उशिरा होणाऱ्या मीटिंगमधून घरी परतणं असो किंवा दुसऱ्या शहरात एकटीनं काम करणं असो. या सर्व आव्हानांमध्ये स्वसंरक्षण (Self-defence) ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही दुस-या शहरात एकटे राहत आहात. अशावेळी तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर तुम्ही नेहमीच सावध राहणं आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

Womens Safety Tips
मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव डबा

तुमच्या एखाद्या चुकीमुळे मोठा त्रास होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्च रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने तुम्ही सुरक्षेच्या बेसिक सेफ्टी टिप्स शिकू शकता आणि हे सर्व इतर महिलांनाही समजावून सांगू शकता. तुमच्या सुरक्षेसाठी नेहमी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आहे ते पाहूयात.

Womens Safety Tips
कमी गुंतवणुकीत मोठं प्रॉफिट, महिलांसाठी व्यवसायाच्या संधी!

महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी टिप्स

पोलिस व्हेरिफिकेशननंतरच घरी हाऊस हेल्पर ठेवा:

घरकामासाठी हाऊस हेल्परवर ठेवत असाल तर विश्वासू हाऊस हेल्परची निवड करा. त्यानंतर त्या व्यक्तीची पोलिस व्हेरिफिकेशन (Police Verification) करून घ्या.

सेफ्टी डोअर बसवा:

घरात एकटे असाल तर घरात सेफ्टी डोअर (Safety Door) बसवा. जेणेकरून कोणीही आपला दरवाजा उघडू शकणार नाही. घराची बेल वाजल्यावर लगेच दरवाजा उघडू नका, तर सेफ्टी डोअरमधून आधी बाहेर कोण आलयं ते बघा.

फोन नेहमी फुल चार्ज ठेवा:

जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुमचा फोन नेहमी पूर्ण चार्ज (Keep the phone fully charged) असेल याची काळजी घ्या. गाणं ऐकत किंवा कुणाशी तरी बोलायला एकटं जाण्यापेक्षा अशावेळी काळजी घेऊन तुम्ही सावध व्हाल. अशावेळी जीपीएस सिस्टीम नेहमी ऑन ठेवा.

Womens Safety Tips
महिलांसाठी टोल फ्री क्रमांक होणार सुरू

तुम्ही बाहेर कुठे जाताय ते घरी सांगा:

ऑफिस किंवा कॉलेजला जाताना आई-बाबांना किंवा भावंडांना सांगायलाच हवं. जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर ते आपल्याला मदत करतील.

कॉल हिस्ट्री लिस्टमध्ये एकदम टॉपवर घरचा नंबर ठेवा:

तुमच्या मोबाइलच्या कॉल हिस्ट्री लिस्टमध्ये (Call History List) तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर सर्वात वर आहेत ना, याची नेहमी खात्री करून घ्या. असं केल्याने अडचणीवेळी तुम्हाला फोन करायला वेळ लागणार नाही.

गाडीचा नंबर शेअर करा:

रात्री एकटीने प्रवास करायचा असेल तर गाडीत बसण्यापूर्वी गाडीचा नंबर (Number of the Car) शेअर करा. कधीही एकट्याने बसने प्रवास करू नका.

लोकेशन ट्रॅकर ऑन करा:

रात्री उशीरा प्रवास करताना लाइव्ह लोकेशन ट्रॅकर (Location Tracker) ऑन करा.

Womens Safety Tips
महिलांसाठी स्त्री शक्ती पुरस्कार

पेपर स्प्रे जवळ ठेवा:

तुमच्या हँडबॅगमध्ये नेहमी पेपर स्प्रे (Paper Spray) ठेवा. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लगेच त्यांच्या डोळ्यांत ते स्प्रे मारु शकता. असे केल्याने तुम्हाला तेथून पळून जाणे सोपे जाईल.

प्रायव्हेट पार्टवर करा हल्ला:

तुमच्याशी कोणी गैरवर्तन करत असेल, तर संधी मिळताच त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जोरदार मारा. प्रायव्हेट पार्टला मारल्याने पुरुषांची शारीरिक शक्ती काही वेळ कमी होते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या व्यक्तीपासून पळून जायला वेळ मिळेल.

स्वतःवर विश्वास ठेवा :

जर कोणी रात्रंदिवस तुमच्यामागे लागत असेल तर अशावेळी रस्त्यावर दुकान असेल तिथे उपस्थित दुकानदाराला तुम्ही तुमचे म्हणणे सांगू शकता. किंवा तुम्ही एटीएममध्येही जाऊ शकता. तिथे उपस्थित असलेले गार्ड आणि सीसीटीव्ही तुम्हाला मदत करू शकतात.

शॉर्टकट टाळा:

रात्री बाहेर एकटे फिरताना कधीही शॉर्टकट जाणे टाळा. कोणत्याही निर्मनुष्य रस्त्यावरून आणि छोट्या वाटेने जाण्याऐवजी मुख्य रस्त्याचा वापर करा, जिथे तुम्हाला रहदारी दिसेल. निर्मनुष्य पार्किंगमध्येही एकटे जाऊ नका, गार्डला तुमच्याबरोबर यायला सांगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com