esakal | राहुल गांधींची योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका; म्हणाले ''यूपीचे कामगार ही योगींची...!''

बोलून बातमी शोधा

Rahul-Yogi

'इतर राज्यांना मनुष्यबळ हवे असेल तर त्यांना आमची परवानगी काढावी लागेल. आमच्या परवानगीशिवाय येथील मनुष्यबळ वापरता येणार नाही.'​

राहुल गांधींची योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका; म्हणाले ''यूपीचे कामगार ही योगींची...!''
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''उत्तर प्रदेशमधील कामगार ही योगी आदित्यनाथ यांची वैयक्तिक मालमत्ता नाही,'' अशी जोरदार टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता.२७) केली. 

उत्तर प्रदेशमधील कामगारांना नोकरीवर घेण्यापूर्वी इतर राज्यांना उत्तर प्रदेश राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला. 

- कामगारांचे स्थलांतर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश; 'हे' आहेत महत्त्वाचे ५ मुद्दे!

गांधी पुढे म्हणाले, 'आदित्यनाथांचे वक्तव्य हे दुर्दैवी आहे. देशातील नागरिक हे पहिल्यांदा भारतीय आहेत मग ते त्यांच्या राज्याचे आहेत. उत्तर प्रदेशमधून देशातील इतर राज्यांमध्ये कुणी कामासाठी जायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाही,' असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

- कोरोनाच्या लढाईत पतंजली देणार मोठे योगदान; करणार...

उत्तर प्रदेशमधील नागरिक हे योगी आदित्यनाथ यांची वैयक्तिक मालमत्ता नाही. ते उत्तर प्रदेशची वैयक्तिक मालमत्ता नाहीत. हे लोक सर्वप्रथम भारतीय आहेत. काय निर्णय घ्यायचा, कुठे काम करायचे आणि त्यांना कशा प्रकारचे जीवन जगायचे आहे, याचा निर्णय घेण्याचा हक्क उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांना आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (ता.२७) लॉकडाउनचे निर्बंध उठवले आणि राज्यातील अर्थचक्र सुरू केले. लाखोंच्या संख्येत स्थलांतरित कामगार राज्यात आल्याने त्यांना काम देण्याच्या दिशेने योजना आखण्यासाठी यूपी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. 

- धक्कादायक! जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये 20 किलो स्फोटके ठेवलेली कार आढळली

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, 'इतर राज्यांना मनुष्यबळ हवे असेल तर त्यांना आमची परवानगी काढावी लागेल. आमच्या परवानगीशिवाय येथील मनुष्यबळ वापरता येणार नाही.' 

कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे उत्तर प्रदेशचे अनेक कामगार आणि नागरिक इतर राज्यांत अडकून पडले होते. त्यांना रेल्वे आणि बसेसद्वारे स्वगृही आणले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप