World Cancer Day 2023 : कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर, पुन्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cancer Day 2023 : कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर, पुन्हा...

World Cancer Day 2023 : कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर, पुन्हा...

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जगभरात कर्करोगाने एक करोड लोकांचा बळी घेतला. कर्करोगाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दर ४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. प्रत्येक आजारावर उपचार करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी कर्करोगाच्या उपचारादरम्यान ते जास्त महत्त्वाचे ठरते. काही रूग्णांना कॅन्सर होऊन गेल्यावरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

कर्करोगाच्या उपचाराचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्या काळात अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कॅन्सपमधून बाहेर पडणे तसे त्रासदायक ठरते. पण, त्यातून योग्य उपचार घेऊन बाहेर पडल्यावरही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

कॅन्सरवरील उपचाराच्या जीवनशैलीतून सावरायला वेळ लागतो. तुमची नवी जीवनशैली पुन्हा कर्करोग होण्यात आणि कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठी भूमिका बजावते. त्यामूळे हा महाभयंकर रोगावर मात केल्यानंतर तूम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

कर्करोग पून्ही होऊ नये यासाठी तुम्ही तूमच्या जीवनशैलीत बदल  करणे आवश्यक आहे. यामध्ये धूम्रपान न करणे, मद्यपान टाळणे, तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे, निरोगी आहार घेणे आणि शारीरिक निष्क्रियता राखणे, अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

कर्करोगाच्या उपचारानंतर रुग्णांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते ते जाणून घेऊया. डॉ. अक्षय शाह, कन्सल्टंट मेडिकल हेमॅटो-ऑन्कोलॉजी आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितले की, कर्करोगाच्या उपचारानंतर औषधांचे अनेक दुष्परिणाम होतात. जसे की शरीरावर मुंग्या येणे, भूक न लागणे

- कर्करोगाच्या उपचारादरम्यान वजन कमी होऊ शकते. औषधांच्या वापरामुळे शुगर लेव्हल वाढू शकते. एखाद्याला नैराश्य किंवा झोपेची समस्या असू शकते हे सर्व सामान्य दुष्परिणाम आहेत.

- याशिवाय जुलाब, खाण्यापिण्याची इच्छा कमी होणे. डोके व मानेच्या कॅन्सरमध्ये रेडिओथेरपीनंतर तोंड कोरडे पडणे, घशात सूज येणे आणि बोलण्यात अडचण येणे.

- कधीकधी जुलाब, डोकेदुखी, उलट्या, तसेच रक्तदाबाशी संबंधित समस्या. इम्युनोथेरपीनंतर शुगर कमी किंवा जास्त होणे.

- थायरॉईडचे फंक्शन्स योग्यरीता कार्य करत नाहीत. त्यामूळे थायरॉईड होण्याचा त्रासही सुरू होऊ शकतो.

- कॅन्सरमधून बरे झालेल्या रूग्णाला उपचारादरम्यान अशा समस्यांना सामोरे जावे लागते. बरे झाल्यानंतरही रुग्णाला आयुष्यभर स्वत:ला जपावे लागते.

- साधारणपणे कर्करोगानंतर केमोथेरपी आणि रेडिएशनमुळे इतर आजार होऊ शकतात. याशिवाय रुग्णाला वारंवार इन्फेक्शन होते. त्यात वजन कमी होण्याबरोबरच भूकही कमी होऊ लागते.

- रूग्णाच्या मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेतली पाहिजे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि चिंता वाढते. कारण कर्करोगावरील उपचार अनेक वर्ष सुरू असतात. त्यामूळे या काळात कौटुंबिक आधार खूप मोठी भूमिका बजावते.

डॉक्टरांचा सल्ला

कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर यापैकी कोणत्याही समस्या उद्भवत असल्या तरी तूमच्या डॉक्टरांशी संपर्क करा. रूग्णालयात जाण्याचा कंटाळा आला असला तरी अशा आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या योग्य उपचारांनी त्वरीत बरे व्हा.